मुंबई - बॉलीवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होणार आहे. याआधी मुंबई पोलिसांकडून त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होत. अद्याप तपास यंत्रणेकडून कोणताही अहवाल आलेला नाही. या प्रकरणी सीबीआयकडून (CBI) माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) उत्तर मागवण्यात आले होते, परंतु तपास यंत्रणेने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. सीबीआयचं म्हणणं आहे की, जर असे काही केले तर आयाचा तपासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी आरटीआय अंतर्गत कोणतीही माहिती देणं योग्य नाही.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले. त्याच्या मृत्यूचा बॉलिवूड स्टार्सपासून चाहत्यांना धक्का बसला होता. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार,सीबीआयने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आणि अर्जदाराला उत्तर दिले, 'सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काहीही शेअर केल्याने तपासावर परिणाम होऊ शकतो. मागितलेली माहिती देता येणार नाही. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' होता, जो त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री संजना संघी होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.