Tiger 3: ठरलं तर..! पठाण नंतर 'टायगर 3'मध्ये देखील पुन्हा एकदा शाहरुख - सलमान, दोघांच्या ऍक्शन सीनसाठी तब्बल ४५ दिवस असणार भव्य सेट

Salman Khan-Shahrukh Khan: यशराज फिल्म्स शाहरुख आणि सलमान यांच्यातील अॅक्शन सीनसाठी भव्य सेट तयार करत आहेत.
Action Scene
Action Scene Saam TV

Action Scene In Tiger 3: शाहरुखच्या 'पठान'नंतर आता चित्रपट प्रेमी सलमान खानच्या 'टायगर 3'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठान'मध्ये सलमानने कॅमिओ केला होता, तर आता शाहरुख 'टायगर 3'मध्ये कॅमिओ करणार आहे. 'टायगर 3' मध्ये सलमान आणि शाहरुख खानचे खूप भयंकर अॅक्शन सीन आणि स्टंट्स असतील, ज्यासाठी निर्मात्यांनी खूप प्लॅनिंग केले आहे.

'पठान'मध्ये शाहरुख आणि सलमान यांच्यातील केमिस्ट्रीचा पुरेपूर वापर करण्यासाठी 'टायगर 3'चे निर्माते कोणतीही कसर ठेवणार नाहीत असे दिसत आहे. यशराज फिल्म्स शाहरुख आणि सलमान यांच्यातील अॅक्शन सीनसाठी भव्य सेट तयार करत आहेत. या सेटवर दोन्ही सुपरस्टारचे महत्त्वाचे अॅक्शन सीन शूट केले जाणार आहेत. म्हणजेच त्यांच्या अ‍ॅक्शन सीन्ससाठी प्लॅनिंग आणि तयारी खूप जय्यत सुरू आहे.

'आयएएनएस'नुसार, एका सूत्राने सांगितले की, प्रॉडक्शन हाऊसला शाहरुख खान आणि सलमान खानचे हे अॅक्शन सीन्स गुप्त ठेवायचे आहेत कारण दोन हिरोंचा क्रॉसओव्हर टायगर 3 ची सर्वात मोठा यूएसपी आहे आणि तोच थिएटरमध्ये प्रेक्षक खेचू शकेल. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊसने सर्व गुप्तता बाळगत भव्य सेट बनवण्याचे कंत्राट दिले आहे. हा सेट ४५ दिवसांत तयार होईल, असे सांगण्यात येत आहे.

Action Scene
Prajakta Mali New Serial: सूत्रसंचालनाकडून अभिनयाकडे; प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर रिएन्ट्री

जेव्हा सलमान शाहरुख खानला पठानमध्ये वाचवण्यासाठी येतो आणि शत्रुंना संपवतो. सलमान शारुखचा हा सीन प्रेक्षकांना खूप आवडला होता. थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आता 'टायगर 3' कडूनही अशीच अपेक्षा केली जात आहे.

'टायगर 3' मध्ये शाहरुख खान आणि सलमान यांच्यात असे अ‍ॅक्शन सीक्वेन्स असावेत, जे प्रेक्षकांसाठी खूप मोलाचे ठरतील आणि ते पाहिल्यानंतर लोक बसल्या जागेवरून उठू नये, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

'पठान'मध्ये सलमानने शाहरुखसोबत ट्रेनमध्ये अॅक्शन सीन केला होता. या सीनच बरीच चर्चा देखील झाली. हा सीन करण्यासाठी 45 दिवस लागले. पण निर्मात्यांनी 'टायगर 3'साठी अधिक मजबूत नियोजन केले आहे.

'टायगर 3'मधला शाहरुखचा एन्ट्री सीन लिहायला आणि प्लॅन करायला 6 महिने लागले. 'टायगर 3'चे दिग्दर्शक मनीष शर्मा आणि निर्माता आदित्य चोप्रा यांनी 'टायगर 3' म्हणजेच सलमान आणि 'पठान' म्हणजेच शाहरुखच्या क्रॉसओव्हरमध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

शाहरुख खान एप्रिलमध्ये 'टायगर 3'चे शूटिंग सुरू करणार आहे. सात दिवस मुंबईत त्याच्या सीक्वेन्सचे शूटिंग होणार आहे. 'टायगर 3' यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. कतरिना कैफ या चित्रपटात झोयाची भूमिका पुन्हा साकारणार आहे, तर इम्रान हाश्मीचा देखील चित्रपटात समाविष्ट झाला आहे.

'टायगर 3'मध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. इमरान बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करत आहे. निर्मात्यांनी इमरान हाश्मीची भूमिका गुप्त ठेवली असली तरी तो चित्रपटाचा भाग आहे की नाही याची देखील अद्याप अधिकृत माहिती नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com