
Will Smith Slapping Incidents: सिनेजगतातला सर्वात मोठा पुरस्कार असलेला ऑस्कर पुरस्कार. या पुरस्कार सोहळ्याला यंदाच्या वर्षी गालबोट लागला. या विशेष पुरस्कार सोहळ्यात, सुपरस्टार विल स्मिथने (Will Smith) ऑस्करच्या (Oscar) मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला (Chris Rock) त्याच्या पत्नीबद्दल विनोद केल्याबद्दल कानाखाली लगावली होती. हे प्रकरण विल स्मिथला चांगलचं भोवलं आहे. विल स्मिथवर आता ऑस्कर सोहळ्यास उपस्थित राहण्यास तब्बल १० वर्षांची बंदी (Banned) घालण्यात आली आहे. (I accept and respect the decision: Will Smith on 10-year Oscars ban)
हे देखील पहा -
या निर्णयानंतर विल स्मिथ म्हणाले की, "मी अकादमीच्या निर्णयाचा स्वीकार करतो आणि त्याचा आदर करतो." असं म्हणत विल स्मिथ याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट हिच्या केसांबाबत केलेल्या विनोदाबद्दल ऑस्कर प्रस्तुतकर्ता ख्रिस रॉकला थप्पड मारणाऱ्या विलस स्मिथवर अकादमीने शिस्तभंगाची कारवाई केली. आहे. "बोर्डाने निर्णय घेतला आहे की, 8 एप्रिल 2022 पासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी, विल स्मिथ यांना कोणत्याही अकादमीच्या कार्यक्रमांना वैयक्तिकरित्या राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, ज्यामध्ये अकादमी पुरस्कारांचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं होतं?
झालं असे की, रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट केली होती. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने रॉकच्या कानाखाली लगावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरे तर, स्मिथची पत्नी जॅडाचे कमी केस हे कोणतीही स्टाईल नसून ती Alopecia नावाच्या टक्कल पडण्याच्या एका आजारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत आणि अशा परिस्थितीत तिची केलेली मस्करी विलला अजिबात आवडली नसल्याने त्याने उठून रॉकच्या कानशिलात लगावली आहे. विलने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर तेथील उपस्थित सर्व जणांना धक्का बसला होता.
त्याचवेळी स्मिथ रागाने रॉकला म्हणाला, “माझ्या बायकोचे नाव तुझ्या तोंडातून काढू नकोस. पुढे स्मिथने, अधिक अपमानास्पद शब्द उच्चारले, ज्याचा ऑडिओ टीव्ही प्रसारणाने काही सेकंदांसाठी ब्लँक केला आहे.
शिवाय, विल स्मिथला किंग रिचर्डसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथही थोडा भावूक झाला असल्याचे दिसून आले. चित्रपटाची कथा प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांचे वडील रिचर्ड विल्यम्स यांची आहे. ज्यांनी आपल्या मुलींच्या जन्माआधीच आपल्या करिअरची संपूर्ण योजना लिहून ठेवली होती. हा उत्कृष्ट चित्रपट रेनाल्डो मार्कस ग्रीन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि जॅक बॅलिन यांनी लिहिलेला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.