बॉलिवूड अभिनेता झीशान अय्युब सध्या ‘झी ५’वरील ‘हड्डी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाझुद्दिनच्या आणि झीशानच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. नवाझुद्दिनने चित्रपटामध्ये एका तृतीय पंथीयाचे पात्र साकारले आहे, तर झीशान अय्युबने तृतीय पंथीयाच्या प्रियकराचे पात्र साकारले आहे.
सध्या ‘हड्डी’ या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र असून अभिनेता झीशान अय्युबच्या एका मुलाखतीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. या मुलाखतीत अभिनेत्याने ओटीटीवरील कंटेंटबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चर्चेत आले आहे.
अलीकडेच अभिनेता झीशान अय्युबने ओटीटी प्लॅटफॉर्मविषयी भाष्य केलं आहे, तो मुलाखतीत म्हणतो, “सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म अत्यंत तथ्यहिन कंटेंटला सुद्धा दर्जेदार आशय म्हणत आहे. ओटीटी फक्त चांगल्या कंटेंटसाठी आहे, असं मला वाटतं. पण दिवसेंदिवस ओटीटी भ्रष्ट होत चाललं आहे. ओटीटीवर कोणत्याही गोष्टींचं सेलिब्रेशन केलं जातं. अनेकदा वाईट गोष्टींचं चांगलं म्हणून देखील ओटीटीवर वर्णन केलं जातं. ओटीटीविश्वात अनेक अभिनेत्यांनी चांगलं काम केलं नसूनही त्यांना सन्मानित केलं जातंय,” अशी प्रतिक्रिया झीशान अय्युबने दिली आहे .
सोबतच यावेळी मुलाखतीत अभिनेत्याने हड्डीमधील त्याच्या भूमिकेबाबत सांगितले की, “मला माझी भूमिका लहान आहे की, मोठी याचा फरक पडत नाही. माझं जेवढं काम आहे, ते काम आनंद घेत करायचं आहे. माझे चित्रपटामध्ये अनुराग कश्यपसोबत फारसे सीन्स नाहीत, पण असं असूनही मला या चित्रपटातले माझं पात्र साकारताना मला मज्जा आली. चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये झीशान अयुबचे नाव कायमच घेतले जाते.”
अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित हड्डी हा चित्रपट ७ सप्टेंबरला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नवाझुद्दिन सिद्दीकी, अनुराग कश्यप आणि झीशान अय्युब सह अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा अदम्य भल्ला आणि अक्षत अजय शर्माने केलेली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.