अभिनेत्री तापसी पन्नू दिसणार बायोपिकमध्ये, उत्कंठा वाढवणारा ट्रेलर पाहा!

वायकॉम १८ स्टुडिओ निर्मित 'शाबाश मिठू' या आगामी चित्रपटात तापसी पन्नू ही क्रिकेटपटू मिताली राजची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १५ जुलैला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
Taapsee Pannu Upcoming Movie
Taapsee Pannu Upcoming Movie Saam Tv

मुंबई : बॉलिवूड (bollywood)आणि साउथची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत असते. मग ते 'थप्पड'सारखा घरगुती हिंसाचारावर आधारित सिनेमा असो किंवा 'बेबी'सारखा देशभक्ती या विषयावरील सिनेमा असो, तापसी पन्नू ही नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत आलेली आहे. आता तापसी पन्नू ही एका बायोपिकमध्ये दिसणार आहे.

Taapsee Pannu Upcoming Movie
'हा' चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर कोर्टात होणार स्क्रिनिंग

वायकॉम १८ स्टुडिओ निर्मित 'शाबाश मिठू' या आगामी चित्रपटात(movie) तापसी पन्नू ही क्रिकेटपटू मिताली राजची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट १५ जुलैला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

तापसीने या सिनेमाचा ट्रेलर तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मिताली राज हे नाव सर्वांना माहीत आहेच, पण आता ती इतकी महान क्रिकेटपटू का झाली, यामागील कथा बघण्यासाठी तयार व्हा! "द जेंटलमन्स गेम" ची नव्याने व्याख्या करणाऱ्या महिलेची कथा तुमच्यासमोर आणताना मला खूप अभिमान वाटतो आहे. 'शाबाश मिठू' १५ जुलै'.

Taapsee Pannu Upcoming Movie
'पुष्पा: द रुल' या चित्रपटाची स्टोरी झाली लीक; श्रीवल्लीचा...

ट्रेलरमध्ये काय?

२ मिनिटे २४ सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या व्हिडिओमध्ये मिताली राजच्या बालपणापासून २३ वर्षांच्या क्रिकेट करिअरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमामध्ये मिताली राजच्या करिअरमधील चढउतार आणि संकटांवर मात करून ती कशी यशस्वी झाली, यावर हा सिनेमा बेतलेला आहे. चित्रपटात आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तापसीला कुटुंब आणि समाजाशी लढा देताना दाखवले आहे. या ट्रेलरला बघून तुम्हीही म्हणाल, की क्रिकेटसारख्या खेळात महिलांनी वर्चस्व गाजवणं खूपच कठीण असतं.

मिताली राज हिची २३ वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आहे. तिने अनेक विक्रम मोडीत काढत एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,००० हून अधिक धावा केल्या आहेत. या सिनेमाचे श्रीजीत मुखर्जीने दिग्दर्शन केले असून, या सिनेमामध्ये तापसीसोबत विजय राजने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com