मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. एका पोर्नस्टारला उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. आरोही बर्डे असं या पोर्नस्टारचं नाव आहे. ती बांगलादेशी चित्रपटांत काम करते. बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट बनवल्याप्रकरणी या पोर्नस्टारला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोही बर्डे एक बांगलादेशी प्रौढ चित्रपट अभिनेत्री आहे. बनावट भारतीय पासपोर्ट बनवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलिस तिच्या कुटुंबियांचाही शोध घेत आहेत. अभिनेत्री विरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७९, ३४ आणि १४अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोहीचे हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आले होते. त्यावेळी तिच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये तिचे कागदपत्रे बोगस असल्याचे समजले. त्यानंतर आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट बनवून ती आपल्या कुटुंबियांसह भारतात राहत आहे. पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांचाही शोध घेत आहेत. त्यात तिची आई अंजली राजाराम पाटील उर्फ रुबी शेख तिचा भाऊ रवींद्र अरविंद बर्डे उर्फ रियाज शेख आणि दुसरा भाऊ रितू अरविंद बर्डे उर्फ मोनी शेख यांचा समावेश आहे.
बनावट पासपोर्टच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात देखील अशीच एक घटना घडली होती. बनावट दस्तावेज पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस ठाण्यात सादर करत महिलेने पाकिस्थानचा व्हिसा मिळून पाकिस्तानमध्ये जाऊन आलेल्या नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान नावाच्या महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.