
बॉलिवूडसाठी २०२३ हे वर्ष यशस्वी ठरताना दिसत आहे. कोरोनानंतर सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला होता. बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करत होते. पण शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर चित्र बदललं आहे.
गेल्या महिन्यात ११ ऑगस्टला सनी देओलचा 'गदर २' आणि पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार यांचा 'OMG २' प्रदर्शित झाला. 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तर 'OMG २'ने देखील चांगली कमाई केली. गंमत म्हणजे हे दोन्ही चित्रपट हे सिक्वेल असून या दोन्ही चित्रपटांबाबत प्रेक्षक खूप उत्सुक होते.
'ओएमजी 2' 'गदर 2'च्या पुढे थोडा कमी पडला. मात्र, या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'ड्रीम गर्ल 2' या सिक्वेल चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी यांच्या 'OMG २' चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला. आता 'ड्रीम गर्ल 2' तारा सिंगच्या 'गदर 2'सोबत स्पर्धा करत आहे.
बॉक्स ऑफिस रिपोर्टिंग साइट Sacnilk ने सांगितले की आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाने तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2' बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 17 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ठप्प झाला. '
OMG 2' ने तिसऱ्या रविवारी फक्त 3.65 कोटी रुपये कमावले आहेत. 'OMG2' या चित्रपटाने 17 दिवसांत 135.02 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला 150 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी अजून बरेच दिवस संघर्ष करावा लागणार आहे. चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळाल्याचा फटका चित्रपटाला बसला असल्याचे निश्चित झाले आहे.
'OMG 2'च्या तुलनेत आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटाने ओपनिंगपेक्षा शनिवार आणि रविवारी अधिक कमाई केली आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा 2019 साली 'ड्रीम गर्ल'मध्ये आयुष्मान खुरानासोबत दिसली होती. आता 5 वर्षांनंतर रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल 2'च्या सिक्वेलमध्ये लोक आयुष्मानसोबत अनन्या पांडेची नवीन जोडी पसंत करत आहेत. या चित्रपटाने पहिल्या रविवारी 16 कोटींची कमाई केली आहे. तर 3 दिवसांत चित्रपटाने एकूण 40.71 कोटींची कमाई केली आहे.
आयुष्मान आणि अनन्या व्यतिरिक्त, राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटात, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, असरानी, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर, सीमा पाहवा आणि अनेक प्रतिभावान आणि अनुभवी कलाकार आहेत. या कलाकारांमुळे चित्रपटात एक वेगळेच विश्व निर्माण झाले आहे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.