Akash Thosar: ‘परश्या’ची क्रेझ अजूनही कायम, भर गर्दीत दिव्यांग व्यक्ती आकाशला भेटण्यासाठी ताटकळत मग पुढे...

आकाश कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाच्या निमित्त प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त असताना त्याला एक वेगळा अनुभव आला.
Akash Thosar
Akash ThosarInstagram

Akash Thosar: अभिनेता आकाश ठोसरने अल्पावधीतच आपल्या चाहत्यांच्या मनात घर केले. त्याच्या परश्या या भूमिकेची क्रेझ आजही इतक्या वर्षांनंतर चाहत्यांच्या मनात कायम आहे. आकाशची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी तरुणींची आणि त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळते. आकाश त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे. आकाश कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाच्या निमित्त प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त असताना त्याला एक वेगळा अनुभव आला.

Akash Thosar
Rashmika-Shreyas Talpade:भर स्टेजवर श्रीवल्लीने केलं किस; रश्मिकाच्या प्रेमात श्रेयस लाजून झाला चूर

पत्रकार परिषद होईपर्यंत आकाशचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वाट बघत भर उन्हात थांबला होता. आकाश आपल्या चाहत्याला भर पत्रकार परिषदेच्या धावपळीतून वेळ काढून भेटला. त्याचबरोबर स्वतः नागराज मंजुळे देखील त्या चाहत्याच्या भेटीस जाऊन त्याच्याशी बोलले, त्याच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले. आकाशचा तो चाहता दिव्यांग होता. यावरून आकाशचे आपल्या चाहत्यांवरचे प्रेम आणि चाहत्याचे आकाशबद्दलचे प्रेम दिसून येते.

Akash Thosar
‘Natu- Natu’ला ऑस्कर मिळाला पण...; कारण सांगत संगीतकाराने मागितली नेटकऱ्यांची माफी

आकाश ठोसरचा आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, सायली पाटील, दीप्ती देवी आहेत. आकाशने या चित्रपटाच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली, तर ‘परश्या’च्या भूमिकेची चौकट मोडून, आगामी चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com