Deepika Padukone In Oscar 2023: २०२३ ला ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताने खूप मोठी मजल मारलेली आहे. या वर्षात एक नाही दोन चित्रपटांनी ऑस्करमध्ये एन्ट्री मारली. 'छेल्लो शो' या चित्रपटाला आणि 'आरआरआर' मधील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर २०२३ मध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. तर दुसरीकडे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, दीपिका पदुकोणला ऑस्कर पुरस्कारामध्ये नवीन ऑफर मिळाली आहे.
दीपिका पदुकोण 13 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्करची प्रस्तुतकर्ती (Presenter) म्हणून काम पाहणार आहे. खुद्द दीपिका पदुकोणनेच चाहत्यांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तिने याबद्दल माहिती शेअर करताच चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'पठान' चित्रपटातील अभिनेत्रीच्या बिकिनीवरून गोंधळ निर्माण केला होता. सोबतच अनेकांनी चित्रपटावर देखील बहिष्कार टाकला होता. पण इतकं होऊन देखील चित्रपटाने जगभरात १००० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. दीपिका पदुकोण ऑस्करची प्रस्तुतकर्ती (Presenter) बनल्याच्या बातमीने बॉलिवूड स्टार्समध्येही खळबळ उडाली आहे. नेहा धुपियापासून पती रणवीर सिंगपर्यंत सर्वांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणते, तिच्यासोबत कोणकोणत्या कलाकारांना ऑस्कर २०२३ चे प्रस्तुतकर्ता (Presenter) म्हणून मान मिळाला आहे, त्यांचे ही तिने नाव सांगितले. दीपिकासोबत, ड्वेन जॉन्सन, मायकेल बी. जॉर्डन, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल. जॅक्सन, मेलिसा मॅककार्थी, झो सालडाना, जोनाथन मेजर्स, क्वेस्टलव्ह आणि डॉनी येन ऑस्करमध्ये सादरकर्ते आहेत. याशिवाय रिझ अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, एरियाना डीबोस, जेनेल मोने आणि सॅम्युअल एल. जॅक्सन हे ऑस्कर सादरकर्ते असतील.
यावेळी दीपिका पदुकोणच्या फॅशनचा जलवा पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना परदेशात अनुवता येणार आहे. कान्स आणि इतर फिल्म फेस्टिव्हलमध्ये थिरकल्यानंतर आता दीपिका पदुकोण ऑस्करवरमध्ये ही थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका पदुकोण ऑस्कर प्रस्तुतकर्ता असून 'नाटू नाटू' गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ऑस्करमध्ये लाइव्ह परफॉर्म करणार आहेत. 'नाटू नाटू'ला ऑस्करच्या 'बेस्ट ओरिजिनल सॉन्ग' श्रेणीत नामांकन मिळाले आहे. याशिवाय 'छेल्लो शो' सोबत भारतातील दोन माहितीपटांना देखील नॉमिनेशन मिळाले आहे. ते चित्रपट म्हणजे 'ऑल दॅट ब्रेथ्स आणि द एलिफंट व्हिस्परर्स'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.