Marathi Bigg Bossच्या घरात Controversy ला आले उधाण

मराठी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय झालेला बिगबाॅसचा नवा सीझन आता सुरू झाला आहे.
Marathi Bigg Bossच्या घरात Controversy ला आले उधाण
Marathi Bigg Bossच्या घरात Controversy ला आले उधाणSaam Tv
Published On

श्रेयस सावंत

मुंबई : मराठी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय झालेला बिगबाॅसचा Marathi Bigg Boss New Season नवा सीझन आता सुरू झाला आहे. या पर्वाचा पहिला आठवडा नुकताचं पार पडला. अन् पहिल्या आठवड्याचं वेगेळ्या कलाकारांच्या वेग वेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

हे देखील पहा-

बिग बाॅस चे घर हे 15 कलाकारांच एक धमाल घर आहे. इकडे फक्त कलाकार येत नाहीत तर महाराष्ट्राचे असे लोक येतात ज्यांना महाराष्ट्र फक्त पाहात असतो, मग ते टीव्हीवर असो किंवा सोशल मिडियावर. या वेळी तर बिग बाॅस च्या तिसऱ्या पर्वांनी 15 लोकप्रिय चेहऱ्यांचे स्वागत केलं आहे. या मधून अर्थात काही कलाकार आहेत पण खरी चर्चा रंगते अश्या लोकांची जे या सिनेसृष्टी सोबत निगडीत नसतात.

अश्या मधलं पहिलं नाव म्हणजे तृप्ती देसाई यांच. तृप्ती देसाई हे नाव महाराष्ट्रच्या घरा घरात ओळखल जातं. महिल्यांच्या हक्कासाठी नेहमी लढणारा तृप्ती देसाई जेव्हा बिगबाॅसच्या घरात येतात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता द्विगुनीत होते. तृप्ती देसाई यांनी आल्या आल्या बाकी घरच्या स्पर्धाकाच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. कधी त्या हास्तात तर कधी त्या बांधतात त्यामुळे तृप्ती देसाई यांच्या बाबत कमाल चर्चा सोशल मिडियावर सुरू झाली आहे.

Marathi Bigg Bossच्या घरात Controversy ला आले उधाण
QUAD बैठकीत तालिबानी सरकारवर विचारमंथन...

यानंतरच्या स्पर्धक म्हणजेचं लोकप्रिय किर्तनकार शिवलीला. शिवलीला आपल्या किर्तनातून नेहमी जन माणसाला जीवणाचा बोध देणाऱ्या शिवलीला बिग बाॅसच्या घरात कशी राहते याची चर्चासध्या सोशल मिडियावर सुरू झाली आहे. एवढंच नाही तर एका एपिसोडमध्ये त्यांनी अभिनेता विकासनी बनवलेल्या जेवणाचं कौतुक केल आणि ते ही सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

यानंतर ज्या कलाकाराची धमाल चर्चा होते आहे. ते कलाकार म्हणजेचं कोळी गाण्यांचा कमाल आवाज म्हणजेचं सगळ्याचं लाडके दादूस. एका आठवड्यात दादूस यांचा चाहता वर्ग फक्त बाहेरचं वाढत नाही आहे पण घरात ही वाढत चालाये. बाकी घरच्यांनासुधा दादूसची गाणी आणि धमाल अवडू लागली आहे.

पण मराठी बिग बाॅस 3 च्या या सगळ्या 15 स्पधकांन पेकी जर एका स्पर्धकाची सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर तो स्पर्धक म्हणजेचं जय दुधाणे. जयचा गेम त्याची बोडी हा सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विष्य झाला आहे. महत्वाचं म्हणजे जय सध्या महाराष्ट्रातल्या लाखो तरूणीचा लाडका स्पर्धक झाला आहे.

मराठी बिग बाॅसच्या 3 पर्वाला सुरू होऊन आता एकच आठवडा झाला आहे. पण या एका आठवड्याचं या कार्यक्रमाची एवढी चर्चा सुरू झाली आहे की आता येणारा प्रत्येक आठवड्यात कार्यक्रम अजुन अजुन रंगत जाईल यात कोणतीचं शंका नाही.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com