रामनाथ दवणे
आर्यन खान पार्टी केस: तब्बल 26 दिवस तुरुंगात असलेला आर्यन खान अखेर जमीन मिळाल्यानंतर तुरुंगाच्या बाहेर येणार होता. काल (ता. २८) गुरुवारी न्यायालयाने आर्यन आणि या प्रकरणातील त्याचे सोबती अरबाज आणि मुनमुन धामेचा जमीन अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे जेल मधील त्यांचा मुक्काम संपनार होता. जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची जमीन ऑर्डर देखील निघाली होती. परंतु कायेदशीर प्रक्रियेची वेळ 5.30 पर्यंत असल्याने आजची वेळ संपली आहे. 5.30 वाजता ऑर्डर कॉपी येते त्याची पाहणी होते. आणि त्यानंतर कैदी ला बाहेर काढलं जात. या सर्व प्रक्रियेची वेळ संपल्याने तीनही आरोपी आज जेलमध्येच काढावी लागणार आहे. उद्या 10- च्या सुमारास प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याबद्दल जेल अधीक्षक वायचळ यांनी माहिती दिली आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह आर्यन खानची न्यायालयाने सुटका केली होती. आज वकिलांनी आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत हायकोर्टाकडनं जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी 1 लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तर कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत.
आर्यन खानच्या वकिलांकडून कारागृहातील जामीनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र अरबाज आणि मूनमून धमीचा यांची प्रक्रिया अपूर्ण, मुनमुनकडून अद्याप भायखळा कारागृहात मुनमुनचे जामीन प्रक्रियेचे कागद नाही आले. त्यामुळे आज केवळ आर्यन च सुटणार बाकी दोघे उद्या सुटणार सूत्रांनी माहिती दिली होती.
निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NDPS कोर्टात सादर होताच कोर्टाने कागदप्र्रक्रिया पूर्ण करून सुटकेचे आदेश दिले आहेत. तर जेष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यनच्या सुटकेची कागद्पत्रप्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
तर आर्यनच्या सुटकेसाठी वडील शाहरुख खान आणि त्याच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सत्र न्यायापूर्ण झाली आहे. त्यानंतर आर्यन खानची जेलमधून सुटका होऊन २६ दिवसांनी आपली घरी रवानगी होणार होती.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.