IIFA Award Winner List: अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्सची धूम सुरु आहे. बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी अबूधाबीमध्ये हजेरी लावली आहे. नृत्य, गायन, संगीत अशा मनाला सुखावणाऱ्या परफॉर्मन्सची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वर्षी सर्व स्टार्स अवॉर्ड शोमध्ये आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क करणार आहेत.
आयफा पुरस्काराचे अनेक अपडेट्स समोर येत आहेत. स्टार्सच्या लूकपासून ते प्रेस कॉन्फरन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आयफाने या शोच्या तांत्रिक पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.
IIFA चा टेक्निकल अवॉर्ड शो फराह खान आणि राजकुमार राव यांनी होस्ट केला. सुनिधी चौहान, बादशाह, जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही यांच्यासह अनेक स्टार्सनी टेक्निकल नाईटमध्ये दमदार परफॉर्मन्स केला. ज्यामुळे या अवॉर्ड नाईटची रंगात आणखी वाढली. दरम्यान, 9 श्रेणींमध्ये तांत्रिक पुरस्कारही जाहीर करण्यात आले. (Latest Entertainment News)
नऊ श्रेणीतील तांत्रिक पुरस्कारांमध्ये सिनेमॅटोग्राफी, पटकथा, संवाद, साउंड डिझाइन, कोरिओग्राफी, एडिटिंग, स्पेशल इफेक्ट्स, बॅकग्राउंड स्कोअर आणि साउंड मिक्सिंग यांचा समावेश आहे. विजेत्यांच्या यादीत आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला तीन विभागांमध्ये पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी सुदीप चॅटर्जी, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी संजय लीला भन्साली आणि उत्कर्षिनी वशिष्ठ, सर्वोत्कृष्ट संवादांसाठी उत्कर्षिनी वशिष्ठ आणि प्रकाश कपाडिया यांना देण्यात आला. याशिवाय, उर्वरित विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे.
सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
बॉस्को सीझर (भूलभुलैया 2)
सर्वोत्तम साउंड डिझाइन
मंदार कुलकर्णी (भुलभुलैया 2)
सर्वोत्तम एडिटिंग
संदीप फ्रान्सिस (दृश्यम २)
सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट्स (विजुअल)
DNEG, रीडिफाईन (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्तम बैकग्राउंड स्कोर
सॅम सीएस (विक्रम वेध)
सर्वोत्तम ध्वनी मिश्रण
गुंजन ए साह, बोलॉय कुमार डोलाई आणि राहुल कर्पे (मोनिका ओ माय डार्लिंग)
आज म्हणजे, 27 मे रोजी आयफा अवॉर्ड्सचा समारोप समारंभ आहे. जो अभिषेक बच्चन आणि विकी कौशल होस्ट करणार आहेत. यादरम्यान अनेक धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.