अभिनेत्री कंगना रनौतचा 'तेजस' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना या चित्रपटामुळे चर्चेत होती. चित्रपट पाहिल्यांनंतर प्रेक्षकांनी त्याचे रिव्ह्यू देखील शेअर केले आहेत.
'तेजस' चित्रपट एक देशभक्तीपर चित्रपट आहे. या चित्रपटात हिरोईन केंद्रस्थानी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवारा यांनी केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'तेजस' चित्रपट तेजस गिल या फायर पायलट जीवनावर आधारित आहे. तेजस देशाला वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार असते. सिनियर्सची आज्ञा न पाळल्याने तिच्यावर अॅक्शन घेण्याची तयारी सुरु असते. परंतु तितक्यात भारताचा स्पाय पाकिस्तानात पकडला गेल्याची बातमी येते.
तेजस त्या भारतीय स्पायला वाचविण्याची जबाबदारी घेते. या मिशनच्या दरम्यान स्पायकडे अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराविषयी माहिती मिळते. स्पायला वाचविण्यासाठी आणि राम मंदिराला असलेले धोका जाणून घेण्यासाठी 'तेजस' सुसाईड मिशनवर जाण्याच्या निर्णय घेते.
चित्रपटाची कथा खूप स्ट्रॉंग आहे. पण चित्रपटाचे एडिटिंग, व्हीएफएक्स तुम्हाला एखाद्या कार्टून मुव्हीसारखे असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी चित्रपटामध्ये खूप विरोधाभास असल्याचे समीक्षकांनी सांगितले आहे.
चित्रपटातील सीन्स सिंक नाहीत, असे समीक्षकांच्या मत आहे. चित्रपटामध्ये डिनर दाखविल्यानंतर पुढच्या सीनमध्ये दाखविण्यात आला आहे की, 'तुझं दुपारचं जेवली नाहीस ना, चल आपण डिनर करू.' चित्रपटामध्ये अनेक मोठी मोठी आव्हान चुटकी सरशी सोडविली गेली आहेत. त्याच्यासाठी कोणताही बिल्डअप केलेला नाही. (Latest Entertainment News)
समीक्षकांचे मतं चित्रपटाच्या बाजून नसले तरी प्रेक्षकांनी चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. त्यांना चित्रपटातील कंगनाचे काम आवडले आहे. तसेच चित्रपटातून देण्यात आलेला 'महिला सक्षमीकरण' या मुद्द्याचे देखील प्रेक्षक कौतुक करत आहेत.
कंगना रनौत गेल्या काही वर्षांपासूनएकही हिट चित्रपट देऊ शकलेली नाही. तिच्या 'तेजस' चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. कंगनाचा तामिळ चित्रपट 'चंद्रमुखी २' प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर देखील उपलब्ध आहे. तर पुढील वर्षी कंगनाची नवीन चित्रपट 'इमेजन्सी देखील प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.