Priyanka Chopra: दीपिका- कतरीना नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे आगामी बॉलिवूड सुपरस्टार, प्रियंका चोप्राचे भाकीत

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राने एका स्टारकिडचे बॉलिवूडची पुढची सुपरस्टार म्हणून नाव उच्चारले.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv

Priyanka Chopra: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांची मांदियाळी आपल्याला दिसून येत आहे. प्रत्येक जण आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सुपरस्टार होण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा अभिनेत्रींचा विचार केला जातो तेव्हा ते आणखी कठीण होते. पण बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राने एका स्टारकिडचे बॉलिवूडची पुढची सुपरस्टार म्हणून नाव उच्चारले.

एका हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपले सुपरस्टार म्हणून नाव उच्चारल्यानंतर अभिनेत्रीच्याही आनंदाला पारावार उरला नाहीये. त्यानंतर तिने प्रियांकाचे खास आभार मानले आहेत.

Priyanka Chopra
Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीचा 'तो' चित्रपट काल्पनिक ? नॉर्वे दूतावासाच्या वक्तव्याने चर्चेला उधाण, नेमकं काय आहे प्रकरण?

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान, प्रियांका चोप्रा तिच्या चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात पोहोचली होती, जिथे बॉलिवूडच्या पुढच्या सुपरस्टारचे नाव समोर आले आहे. प्रियांका चोप्राने तिथे मुलाखतीदरम्यान आगामी सुपरस्टारचे नाव जाहीर केले.

त्यावेळी प्रियंका म्हणते, “मला माहित आहे की, आपल्या देशातली पुढची सुपरस्टार कोण आहे. मला पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाला मला पुढची सुपरस्टार म्हणून पाहायचे आहे. माझा विश्वास आहे आणि मी बरोबर म्हणतेय की नाही हे लवकरच कळेल. प्रियांकाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.”

Priyanka Chopra
Khayali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप; पीडित महिलेने घेतली पोलिसांत धाव

व्हिडिओवर कमेंट करताना काही यूजर्स म्हणतात, ‘प्रियांकाने अलाया फर्निचरवालाचे नाव घेतले आहे, त्यामुळे आता तिला खूप चांगले चित्रपट मिळतील.’ अलायाने सैफ अली खानसोबत ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्रियांकाच्या कमेंटवरून अलायाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीचा हा व्हिडिओ शेअर करत एक खास टिप लिहिली आहे.

अलाया तिच्या पोस्टमध्ये म्हणते, ‘मला कसे वाटते हे मी एका शब्दात वर्णन करू शकत नाही. जेव्हा आपल्या आवडत्या कलाकाराला पुढचा सुपरस्टार कोण असेल? असा प्रश्न विचारतात आणि तो तुमचं नाव घेतो, जगात यापेक्षा चांगली भावना असू शकत नाही… धन्यवाद प्रियांका चोप्रा.’

अलाया कार्तिक आर्यनसोबत 'फ्रेडी' चित्रपटात दिसली होती, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. आता अलाया लवकरच 'अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'मध्ये दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com