Satish Kaushik: सतिश कौशिक यांची अखेरची इच्छा अपूर्णच, पोटच्या मुलीसाठी करायची होती 'ही' गोष्ट
Satish Kaushik: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते सतिश कौशिक यांच्या अचानक एक्झिटने संपूर्ण बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. ९ मार्चला होळी सेलिब्रेशन केल्यानंतर रात्री अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला होता. सध्या दिल्ली पोलीस त्यांचा मृत्यूचे उकल करीत आहे. सतीश यांच्या अचानक एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता मुखर्जीनं एका मुलाखतीमध्ये सतीश यांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचं सांगितलं आहे.
सुष्मिता मुखर्जीने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सतिश यांचा सोबतचा एक किस्सा सांगितला आहे, 'अलिकडेच मी सतिश यांना भेटले होते. त्यांची तब्येत बरीच असल्याने त्यांनी काही डाएट फॉलो केले होते. त्यावेळी मी त्यांच्या डाएट आणि व्यायामाचं कौतूक केलं होतं. वजन कमी करायचं असल्याने ते चालण्यावर देखील अधिक भर देत होते. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कधी दारू प्यायले नाही, तर कधी मांसाहरही खाल्लं नाही. त्यांचं वजन कमी झाल्याने त्यांना खूपच आनंद झाला होता.'
सुष्मिता पुढे मुलाखतीत म्हणते, ' मी त्यांना कधीच चालताना पाहिले नव्हते, त्यांनी आपल्या परिवारासाठी खूपच तब्येतीची काळजी घेतली होती. सतिश मला म्हणाले होते, आता मला माझी दहा वर्षांची मुलगी वंशिका हिच्यासाठी पुढील आयुष्य जगायचे आहे. पण त्यांची ही अखेरची इच्छा कायमचीच अपूर्ण राहिली आहे.'
सोबतच या मुलाखतीत सुष्मिता यांनी पती राजा बुंदेला आणि सतीश यांच्या नात्याबद्दलही भाष्य केलं आहे. सुष्मिता म्हणते, 'मला सतिश यांचा संघर्ष पतीसोबत राहत असल्यापासून माहित आहे. ते आमच्या घराच्या बाजूलाच राहायचे. आम्ही सर्वांनी एकत्र नाटकात देखील काम केले आहे. त्यांचा नाटकात अभिनय देखील चांगलाच राहायचा. ४० वर्ष सोबत असलेल्या मित्राबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द अपूरे आहेत. बहुआयामी आणि एकाच क्षेत्रात अष्टपैलू असलेला अभिनेता मी पहिल्यांदाच पाहिला असावा. सतिश उत्तम दिग्दर्शक असून उत्तम विनोदी अभिनेते देखील होते.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.