Shilpa Shetty Birthday: इतक्या वर्षानंतरही शिल्पाच्या मनात आहे ‘या’ गोष्टीची भिती; म्हणून शूटिंगला जाताना करते...
Shilpa Shetty Reveal What's She Is Scare About: शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने चित्रपटांतून उत्तम कामगिरी केली. अनेक चित्रपटांतून आणि रिॲलिटी शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आज अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वाढदिवस, तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याविषयी खास गोष्ट...
आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली शिल्पा शेट्टी तिने अनेक जाहिरांतीतून, चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोबतच काही टेलिव्हिजन शोवर सुद्धा तिने परिक्षकाची भूमिका साकारली आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ती वाचून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.
पण हे खरं आहे की, शिल्पा शेट्टी कार चालवताना खूपच घाबरते. याच कारणामुळे शिल्पा नेहमीच तिच्यासोबत तिचा ड्रायव्हरसोबत घेऊन जाते, मनात गाडीची भिती असल्यामुळे ती कधीच गाडी चालवत नाही. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अभिनेत्री बॉडी डबल्सचा वापर करूनच ती ॲक्शन सीनची शूटिंग करते.
शिल्पा शेट्टीने १९९३ मध्ये ‘बाजीगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. पहिल्याच चित्रपटात शिल्पाने आपल्या अभिनयानं अनेक दिग्गज अभिनेत्रींचा घाम फोडाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून तिने आपल्या फिल्मी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ती केवळ एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर अनेकांसाठी आदर्श देखील ठरलीय. अभिनयासोबतच शिल्पाने बिझनेस आणि फिटनेसमध्येही आपले नशीब चमकवले. शिल्पाने खरंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ते, एका कोल्ड्रिंकच्या जाहिरातीतून. तिने ती जाहिरात केली आणि तिचे नशीबच पालटले.
शिल्पाने चित्रपट आणि जाहिरातींमधून अनेक कोटींचा व्यवसाय केला आहे. सोबतच शिल्पाने अनेक फिटनेस संबंधित व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून ती अनेक कोटींचा व्यवसाय सांभाळते. याशिवाय तिचे अनेक व्यवसाय आहेत जिथून ती बराच पैसा कमावते. शिल्पा सध्या अभिनयासोबतच अनेक फिटनेस संबंधित व्यवसाय पाहत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.