Parineeti-Raghav Engagement: बहीण Parineeti च्या साखरपुड्यासाठी 'देसी गर्ल' दिल्लीत, Priyanka Chopra चा व्हिडिओ व्हायरल

Priyanka Chopra Video: बहिणीच्या साखरपुड्यामध्ये चार चाँद लावण्यासाठी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) दिल्लीत दाखल झाली आहे.
priyanka chopra arrives in delhi
priyanka chopra arrives in delhiInstagram

Parineeti Chopra -Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज साखरपुडा होणार आहे. परिणीती आणि राघवचा साखरपुडा नवी दिल्लीतील (Delhi) कपूरथला हाऊसमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्यांच्या साखपुड्यासाठी खास पाहुणे यायला देखील सुरुवात झाली आहे. बहिणीच्या साखरपुड्यामध्ये चार चाँद लावण्यासाठी बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) दिल्लीत दाखल झाली आहे.

priyanka chopra arrives in delhi
Raghav- Parineeti Engagement Update: क्यूट कपलच्या साखरपुड्याला असणार विशेष थीम; प्रियंकासह ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी...

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. या शाही साखरपुड्यासाठी दोघांच्या जवळचे नातेवाई आणि मित्र परिवार हजेरी लावणार आहे. तसंच अनेक व्हीआयपी गेस्टची नावं देखील समोर आली आहेत. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत. या साखरपुड्यासाठी जवळपास 150 लोकं सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. अशामध्ये प्रियांका चोप्रा या साखरपुड्यासाठी लंडनवरुन आली आहे. दिल्लीमध्ये नुकताच ती दाखल झाली आहे. दिल्ली एअरपोर्टवर पोहचल्याचा प्रियंका चोप्राचा व्हिडिओचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परिणीतीच्या साखपुड्याला बहीण प्रियंका चोप्रा, जिजू निक जोनस आणि भाची मालती मैरी जोनास हजेरी लावणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण एअरपोर्टवरुन फक्त प्रियंका चोप्रा एकटी येताना दिसली. त्यामुळे निक आणि मालती या साखरपुड्यासाठी आले की नाही? असा प्रश्न प्रियंकाच्या चाहत्यांना पडला आहे.

priyanka chopra arrives in delhi
Adipurush Cast Fees: ‘आदिपुरुष’ साठी सेलिब्रिटींनी घेतले तगडे मानधन; ट्रोल होणाऱ्या सैफचं मानधन पाहाल तर व्हाल अवाक....

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या आणि डेटिंगच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या होत्या. तसंच लवकरच ते साखरपुडा करणार असल्याचे देखील बोलले जात होते. पण दोघांनी याबाबत अधिकृत माहिती न दिल्यामुळे सगळेच संभ्रमात होते. अखेर आज त्यांच्या साखरपुड्याचा दिवस उजाडला आहे. खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक आणि शाही भोजन हे परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचं विशेष आकर्षण आहे. आता परिणीतीचे चाहते तिच्या साखरपुड्याचा लूक पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com