Chhaava Advance Booking: 'छावा' ओपनिंग डेला धुमाकूळ घालणार, ॲडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी

Chhaava Advance Booking Day 1 : 'छावा' चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी किती कमावले, जाणून घ्या.
Chhaava Advance Booking Day 1
Chhaava Advance BookingSAAM TV
Published On

सध्या सर्वत्र 'छावा' (Chhaava) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. 'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. भविष्यात चित्रपट रिलीज झाल्यावर खूप कमी वेळात 'छावा' बंपर कमाई करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'छावा' चित्रपट चित्रपट हिंदीत एकूण 4 व्हर्जनमध्ये रिलीज होत असून त्याला 2D व्हर्जनमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. निर्मात्यांनी या आवृत्तीमध्ये जास्तीत जास्त स्क्रीन्स घेतल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, देशभरातील जवळपास 5427 स्क्रीन्सवर हा चित्रपट फक्त 2D मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रेक्षकांना आयमॅक्स 2D, 4DX आणि ICE मध्येही या पीरियड ड्रामा चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

'छावा' ॲडव्हान्स बुकिंग दिवस 1

'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्या दिवशी गर्दी पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या 2D आवृत्तीची 78129 तिकिटे विकली गेली आहेत आणि IMAX आवृत्तीची 1241 तिकिटे आतापर्यंत प्रेक्षकांनी खरेदी केली आहेत. याव्यतिरिक्त, 4DX आणि ICE आवृत्तीसाठी अनुक्रमे 304 आणि 181 तिकिटे पहिल्या दिवशी विकली गेली. जवळपास पहिल्या दिवशी 'छावा' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 3 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

'छावा' चित्रपटाचे बजेट किती?

'छावा' चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे. 'छावा' चित्रपट जवळपास 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे धमाकेदार प्रमोशन देखील करण्यात आले आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळणार आहेत.

Chhaava Advance Booking Day 1
Chhaava Advance Booking : इतिहास घडणार अन् रेकॉर्ड मोडणार; 'छावा' येतोय! ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात; तिकिटाचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com