Hera Pheri 3: मुन्नाभाईची 'हेरा फेरी 3'मध्ये एन्ट्री?, संजय दत्तनेच केला महत्वाचा खुलासा

राजू, श्याम आणि बाबुरावसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे संजय दत्त.
Sanjay Dutt In Hera Pheri Part 3
Sanjay Dutt In Hera Pheri Part 3Saam TV

Sanjay Dutt In Hera Pheri 3: बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. या चित्रपटाचा तिसरा भाग आपल्या येणार आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि शेट्टी हे त्रिकुट एकत्र येणार आहे. तर आता या त्रिकूटामध्ये संजय दत्त देखील सहभागी होणार आहे. या बातमीला खुद्द संजय दत्तने दुजोरा दिला आहे.

२००० साली प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' चित्रपटातील राजू, श्याम आणि बाबुराव या व्यक्तिरेखा घराघरात पोहचल्या. २००६ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे 'फिर हेरा फेरी' प्रदर्शित झाला. आता अनेक समस्या आणि अडचणी पार केल्यांनतर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अखेर सुरुवात झाली आहे.

Sanjay Dutt In Hera Pheri Part 3
Janhvi Kapoor: 'मला संधी मिळाली, पण...'; जान्हवी कपूरने व्यक्त केली खंत

अलीकडेच संजय दत्तने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला 'हेरा फेरी 3' बद्दल विचारण्यात आले. संजय दत्तने यावेळी चित्रपटाबद्दल स्पष्टपणे सांगितले. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत तो चित्रपटामध्ये काम करणार आहे. या सर्वांसोबत काम करण्यासाठी संजय दत्त खूप उत्सुक असल्याचे संजय दत्तने सांगितले.

अभिनेता संजय दत्त म्हणाला, “ही एक उत्तम फ्रँचायझी आहे आणि त्याचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. फिरोज आणि माझे नाते खूप जुने आहे आणि अक्षय, सुनील आण्णा आणि परेशसोबत एकत्र येणे उत्तम आहे.”

संजय दत्त 'हेरा फेरी 3'चा भाग असल्याबाबतचे विचार मांडतानाची एक छोटी व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. 'हेरा फेरी 3'मध्ये संजय दत्त, रवी किशनच्या भावाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त होते. 'हेरा फेरी 2' मध्ये रवी हा शरद सक्सेना उर्फ तोतला सेठच्या टोळीचा सदस्य होता. मात्र, याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

'हेरा फेरी 3'चे दिग्दर्शन अनीस बज्मी करणार असल्याची बातमी होती. परंतु आता बच्चन पांडे चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com