Madhur Bhandarkar: मधुर भांडारकरांनी रिमेक चित्रपटांवर केले भाष्य, थिएटरमधील प्रेक्षक घटण्याचे सांगितले कारण

मधुर भांडारकरने या चित्रपटाची कल्पना आणि चित्रपट निर्मितीबद्दल आपला किस्सा सांगितला. यासोबतच त्यांनी थिएटरमधील प्रेक्षकांच्या घटत्या संख्येबद्दलही माध्यमासोबत बोलताना सांगितले
Madhur Bhandarkar
Madhur BhandarkarSaam Tv

Madhur Bhandarkar: मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपट येत्या २ डिसेंबरला झी५ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलावाडीसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासोबतच बॉलिवूड दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी आतापर्यंत 'चांदनी बार', 'पेज 3','हिरोईन' आणि 'फॅशन' सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.

Madhur Bhandarkar
Paresh Rawal : अभिनेते परेश रावल यांना मागावी लागली माफी, ही वेळ त्यांच्यावर का आली?

मधुर भांडारकरने या चित्रपटाची कल्पना आणि चित्रपट निर्मितीबद्दल आपला किस्सा सांगितला. यासोबतच त्यांनी थिएटरमधील प्रेक्षकांच्या घटत्या संख्येबद्दलही माध्यमासोबत बोलताना सांगितले, "वैश्विक कोरोना महामारीमुळे देशातील पहिल्या लॉकडाऊनवरील चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा घरात क्वारंटाईन होतो तेव्हा याच विषयावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपट लेखकांशी यावर चर्चा करत कथा सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला."

Madhur Bhandarkar
Nora Fatehi: नोरा भोवती ईडी चौकशीचा फेरा; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पु्न्हा ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल

सोबतच दिग्दर्शक मधुर भांडारकर पुढे बोलतात, "प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी झाली असून चित्रपट ओटीटी माध्यमावर पाहण्याचा कल सर्वाधिक वाढला आहे. तथापि, हा एक तात्पुरता टप्पा आहे. हा टप्पा उद्योगासाठी थोडा कठीणच आहे, पण ही वेळ सुद्धा निघून जाईल. मला असे वाटते की आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, कारण यावर्षी फारसे चांगले चित्रपट आले नाहीत. यावेळी फक्त एका चित्रपटाचा विचार न करता इंडस्ट्रीचा एकत्रित विचार करायला हवा."

Madhur Bhandarkar
Bhumi Pednekar: उर्फीलाही भूमी पेडणेकरनं मागं टाकलं, बोल्डनेसमुळं अभिनेत्री होतेय ट्रोल

सोबतच पुढे मधुर भांडारकर म्हणतात, "लोकांना आता बहुभाषिक आणि भव्यदिव्य आशय बघायला आवडतो. मी बॉलिवूडमध्ये इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक बनवणे बंद करावे असा सल्ला बॉलिवूडमधील दिग्दर्शकांना देतो. प्रेक्षकांनी मुख्य चित्रपट आधीच पाहिलेला असतो, त्यामुळे रिमेक बनवलेला चित्रपट पाहण्याची इच्छा प्रेक्षकांना फारशी नसते.

अशा परिस्थितीत रिमेक चित्रपट पाहताना प्रेक्षकांना चित्रपट आधीच पाहिला आहे, मग मी पुन्हा सिनेमागृहात जाऊन का चित्रपट पाहू असा सवाल निर्माण होतो. कदाचित मला असे वाटते की, प्रेक्षकांनी मुख्य चित्रपट पाहायला हवा. फक्त चांगल्या लेखकांचीच कलाकृती मोठ्या पडद्यावर आपली जादू कायम दाखवते."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com