
Billi Billi Song Out: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात सलमानने एका मुलीच्या प्रेमात दिसत आहे. येत्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी चित्रपटातील पहिले 'नैय्यों लगदा' हे गाणे प्रदर्शित झाले होते.
त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून आता नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिल्ली बिल्ली' या गाण्यात सलमान धडाकेबाज, तरुण आणि शानदार दिसत आहे. या गाण्यात त्याच्यासोबत पूजा हेगडे, राघव जुआल आणि शहनाज गिल यांची झलक दिसली आहे.
'बिल्ली बिल्ली' हे गाणे प्रदर्शित होताच इंटरनेटवर चांगलीच चर्चा सुरु होती. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटातील गाणे प्रदर्शित केले आहे. हे गाणे सुखबीर यांनी गायले असून सुखबीरनेच गाणे संगीतबद्ध केले आहे. गाणे ऑडिओ व्हर्जनला येताच चाहत्यांचं प्रेम मिळालं. आता निर्मात्यांनी त्याचा व्हिडिओही जारी केला आहे.
गाण्यातील समलान खानच्या डान्स स्टेप्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या गाण्यात सलमान खानची पूजा हेगडेसोबतची धमाकेदार केमिस्ट्रीही गाण्याला चार चाँद लावून जाते. त्यामुळे पुन्हा एकदा सलमान त्याच्या सर्व चाहत्यांना नाचायला भाग पाडेल असे म्हणता येईल.
सलमान खान आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त व्यंकटेश, भूमिका चावला, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांसारख्या स्टार्सचीही पहिली झलक 'बिल्ली बिल्ली' या गाण्यात पाहायला मिळाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.