Bigg Boss Marathi 4 Update: 'बिग बॉस मराठी'मध्ये अनके नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांची दिवाळी तर अप्रतिमच झाली. फराळ, पाहुणे कलाकार, भेटवस्तू असे अनेक सरप्राईज सदस्यांना मिळाले. मतभेद आणि भांडणे हा 'बिग बॉस च्या घरातील अलिखित नियम आहे असे अनेकांना वाटते.
'बिग बॉस'चे घर जसे प्रेक्षकांना चकित करत असते तसेच स्पर्धक सुद्धा इतर स्पर्धकांच्या भूमिकांनी हादरत असतात. प्रत्येक टास्क, चावडी आणि गेमनंतर स्पर्धकांचे मत बदलते, मतभेद होतात. त्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात कोणतेही नाते कधीही शत्रुत्त्वात रुपांतरीत होईल हे सांगता येत नाही. (Bigg Boss)
अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी यांची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघींमध्ये भांडणं झाली, मतभेद झाले तरी त्या काही वेळात परत एकमेकींशी बोलतात. आज यशश्री आणि तेजस्विनीमध्ये चर्चा होताना दिसणार आहे. ज्यामध्ये यशश्री तेजस्विनीला सल्ला देताना दिसणार आहे. यशश्री तेजस्विनीला सांगते की, मी प्रसादशी बोलत होते वरती कारण एकदा बोलून परत क्लिअर करणं गरजेचं आहे. जे काही शिफ्टिंग झालं आहे त्यामुळे एवढा फरक नाही पडणार... इकडचे दोन प्यादे जर तिकडे शिफ्ट झाले आहेत, तसेच तिकडचे दोन प्यादे कुठेतरी जाऊ पाहत आहेत. ते प्यादे इथे शिफ्ट होऊ शकतात. तर आता मला तुमचे विचार ऐकायचे आहेत धोच्या विषयी... कारण हा जो टास्क आहे ना तो उद्या संपेल आणि तुमचा एक बॉण्ड आहे, एक मैत्री आहे जी त्याच्या पलीकडची आहे. ती मैत्री तू मैत्री म्हणून ठेवणार आहे ? की परत इथे ग्रुपिजम होणार आहे? (TV)
यावर तेजस्विनीचे उत्तर देते की, "मला तिच्यासोबत २ - ३ गोष्टी वैयक्तिक लेव्हलवर क्लिअर करायच्या आहेत. ते झालं तर ठीक नाही तर एका सदस्यासारखं... यशश्रीचे यावर म्हणणे आहे, ते तुझ्यावर आहे, पर्सनल समीकरणे पर्सनल ठेव, ग्रुपची लॉयलीटी आता ग्रुपकडे राहू देत..."
अमृता धोगांडे आणि तेजस्विनी लोणारी मधील हे मदभेत किती टोकाचे आहेत हे या भागात पाहायला मिळणार आहेत. याचा परिमाण त्याच्या वैयक्तिक आणि सांघिक खेळावर होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.