Shiv Thakare New Car: एम टीव्ही आणि मराठी 'बिग बॉस ३चा विजेता शिव ठाकरे लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदी बिग बॉस १६मध्ये सहभागी झाल्यापासून शिव नेहमीच चर्चेत असतो. हिंदी 'बिग बॉसचा तो विजेता जरी झाला नसला तरी त्याने लोकांची मन जिंकले आहे.
अलिकडेच शिवने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात पापाराझीं त्याला घेरले. तेव्हा त्याने नवीन कार घेतल्याचे सांगितले. शिव म्हणाला त्याच्याकडे दोन पर्याय होते, त्याने चांगले ऍव्हरेज देणाऱ्या कार घेण्याचा निर्णय घेतला.
पुरस्कार सोहळ्यातून बाहेर येतातच पापाराझींनी शिवला विचारले, "तुम्ही नवीन कार घेत आहात, असं आम्हाला कळलं आहे." यावर शिवने उत्तर दिले, "यार कानावर आलाय सांगितलं नाही अजून... टोकन मनी दिली आहे मी, टोकन परत नाही घेणार... ऍव्हरेजवली गाडी घेतली आहे ब्रो."
त्यानंतर पापाराझींनी शिवला कोणती गाडी घेली असे विचारले. यावर शिव म्हणाला, 'सरप्राईज आहे ब्रो... सर्वात आधी मिठाई तुम्हालाच देणार. दोन पर्याय होते माझ्यासमोर. एक होता कमी ऍव्हरेज एक होता जास्त ऍव्हरेज, इ जास्त ऍव्हरेजवाली घेतली.
शिव पुढे म्हणाला, "मला शेअरिंग नकोय, इच डाके माझ्या गाडीमध्ये डिझेल... भेटू या, धन्यवाद." हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्या उत्साही चाहत्यांनी सोशल मीडियावर शिवसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
एक चाहता म्हणाला, "त्याने नवीन कार घेतली.. देवाने त्याचे सर्व स्वप्न पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे." आणखी एकाने लिहिले, "@ShivThakare9 अभिनंदन आणि देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करो."
बिग बॉस 16ची ट्रॉफी न जिंकता आल्याने निराश आहे का? असे शिवला विचारण्यात आले, यावर एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत शिव म्हणाला, "जो होना था वो हुआ. ट्रॉफी माझ्या मंडळींकडे अली आहे आणि माझा मित्रला (एमसी स्टॅन) मिळाली. त्याबद्दल आणि शेवटच्या दिवसापर्यंत मी तिथे होतो याचाही मला आनंद आहे. जो चीज मैं शिद्दत से की है वो मुझे मिली भी है. माझेही कौतुक झाले आहे. ज्यासाठी गेलो होतो ते मिळाले."
"जेव्हा आपण मनापासून खेळतो, तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु काही गोष्टी या चांगल्यासाठीच होतात. जेणेकरून पुढे जाऊन तुमची काम करण्याची भूक कमी हू नये. माझी भूक वाढली आहे, आता जून दारं उघडली आहेत, आता जे काही काम मिळेल ते शिद्दतने करेन. काही गोढती आपल्या हातात नसतात. जे माझ्याशी जोडले गेले ते आनंदी आहेत. जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी त्यांना मदत करेन."
शिव हणतो की, “माझं आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मी गाडीही बूक केली आहे. हे सरप्राइज होतं. पहिल्यांदाच मी हे सगळ्यांसमोर सांगत आहे. मी कामासाठी बाहेर पडलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलं की, तुझं काम आहे तर तू कार घेऊन नको येऊ. मी माझ्या कामासाठी रिक्षाने जातो. कारण मी माझ्या मित्राच्या कारने प्रवास करतो.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.