
High Court Orders Armaan Kohli Pay To Ex-Girlfriend In Assault Case: बिग बॉस फेम अरमान कोहली सध्या काही वादांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यापूर्वी देखील अभिनेता त्याच्या कामामुळे नाही तर, सर्वाधिक वादांमुळेच चर्चेत आला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस फेम अरमान कोहलीची गर्लफ्रेंडसोबतच्या काही वादामुळे तो चर्चेत आला आहे. एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अरमानसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. न्यायालयाने अरमानसमोर ठेवलेले दोन पर्याय म्हणजे, तिला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी किंवा तुरुंगात जावं. अशे दोन पर्याय अभिनेत्रीसमोर ठेवला आहे.
अरमान कोहलीने त्याची एक्सगर्लफ्रेंड नीरू रंधावाला २०१८ मध्ये मारहाण केली होती. नीरू रंधावाने त्याच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार देखील दाखल केली होती. एक्सगर्लफ्रेंडला मारहाण केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अरमान समोर दोन पर्याय ठेवले आहेत. त्यातील पहिला म्हणजे, तिला ५० लाख रूपयाची भरपाई देऊन तडजोड करावी, असा पर्याय दिला. तर दुसरा पर्याय म्हणजे, जर भरपाई नसेल द्यायची तर तुरूंगात शिक्षा भोगावी. मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला १८ जुलै पर्यंतचा कालावधी दिला असून यावर अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
अभिनेत्याने उच्च न्यायालयात जाऊन २०१८ मध्ये दिलेल्या कोर्टाचा आदेश मागे घेण्याची मागणी देखील केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशात एफआयआर रद्द करून कोहलीची आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली. आता या प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे आणि आरएन लड्ढा म्हणाले, ‘एकतर तू पैसे भर किंवा तुला तुरूंगात शिक्षा भोगायला जावे लागेल.’
अरमानची एक्स गर्लफ्रेंड नीरूने २०१८मध्ये अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दाखल केलेल्या तक्रारीत अभिनेत्री म्हणाली होती, ‘मी आणि अरमान गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही सांताक्रूझमध्ये फ्लॅट घेऊन एकत्र राहत होतो. अरमानने मला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिलं होतं आणि त्याचवेळी माझं डोकं भिंतीवर आपटलं होतं. यामुळे माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याला १५ टाके पडला होता.’
यावेळी अरमानने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुन्हा मी असं वागणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. जर मी तिला पुन्हा मारहाण केली तर, तिला ५० लाख रूपये भरपाई म्हणून देईल. असा दावा खुद्द अभिनेत्याने कोर्टात केला. त्यामुळे आता अरमानला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला पैसे द्यावे लागतील, किंवा तुरुंगात जावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.