Bigg Boss 16: 7.6 कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार .... अशी आहे पुण्याच्या गोल्डन बॉईजची 'गोल्डन लाईफ'

सनी आणि बंटी सलमान खान, विवेक ओबेरॉय सारख्या सेलेब्रिटींसोबत दिसले आहेत.
Sunny and Bunty Bigg Boss 16 Wild Card Contestant
Sunny and Bunty Bigg Boss 16 Wild Card ContestantSaam Tv

Bigg Boss 16 Wild Card Entry: हिंदी 'बिग बॉस १६ चे हे पर्व देखील मागील सर्व पर्वांप्रमाणे दमदार आहे. या पर्वातील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. 'गोल्डन बॉईज या नावाने प्रसिद्ध असलेले सानी वाघचौरे आणि बंटी गुर्जर या दोघांनी 'बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. या दोघानांही भरपूर सोने घालण्याची आवड आहे आणि त्यासाठी दोघेही प्रसिद्ध आहे. सनी आणि बंटी करोडोचे सोने घालतात तसेच खूपच विलासी आयुष्य जगतात.

सनीचे पूर्ण नाव सनी नानासाहेब वाघचौरे आहे. तर संजय गुर्जर हे बंटीचे पूर्ण नाव आहे. सनी आणि बंटी दोघेही चांगले मित्र आहेत. तसेच ते दोघे नेहमी एकत्र असतात. सनी आणि बंटी दोघेही फिल्म फाइनान्सर आणि प्रोड्युसर आहेत. अनेकदा दोघेही सलमान खान, विवेक ओबेरॉय सारख्या सेलेब्रिटींसोबत दिसले आहेत.

Sunny and Bunty Bigg Boss 16 Wild Card Contestant
Amey Wagh: 'गो गो गो गोविंदा' म्हणत अमेय वाघ करतोय चित्रपट प्रमोट, बॉलिवूडमध्ये लवकर दिसणार 'या' दिग्गज कलाकारांसोबत

सनी आणि बंटी यांनी मीडियाला सांगितले की, 'आम्ही दोघे पुण्याचे आहोत, मी आणि बंटी लहानपणापासून एकत्र आहोत. आम्हाला लहानपणापासूनच सोन्याची आवड आहे. आम्ही दोघे जरी मित्र असलो तरी आम्ही एकमेकांवर भावांप्रमाणे प्रेम करतो. आम्ही नेहमी एकत्र असतो. आमचे एकमेकांवर असलेल्या प्रेमाने आम्ही इतके प्रसिद्ध झालो आहोत. लोकांनी आम्हाला 'गोल्डन गाईज' असे नाव दिले आहे.

सनी सांगितले की, "अनेकदा लोकांना वाटते की मी इतके सोने कसे वापरतो. मी लक्षणं सांगू इच्छितो की जर एखादे काम तुम्ही खूप वर्षांपासून करत असाल, तर तुम्हाला त्याची सवय होते. उदारणार्थ जेव्हा जिममध्ये एखादी व्यक्ती व्यायाम करताना १०० किलो वजन उचलते, तेव्हा जिममधील नवीन व्यक्ती विचार करते की हा इतके वजन कसे उचलू शकतो? परंतु हळुहळू सवयीने ती नवीन व्यक्ती देखील १०० किलो वजन उचलते. तसेच मी लहानपणापासून सोने वापरत आहे आणि हळुहळू मी त्या सोन्याच्या वजनामध्ये भर टाकली आहे. (Bigg Boss)

मी जवळजवळ सात-आठ किलो सोने परिधान करतो तर सानी चार-पाच किलो सोने परिधान करतो. तुम्हाला हे सगळं विचित्र वाटत असेल की इतके सोने घालून हे कसे चालत असतील. परंतु आम्हाला इतके सोने घालायला काहीच वाटत नाही. (TV)

आम्हा दोघांनाही सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे. माझ्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या जाड साखळीसारख्या चैनी, मोठ्या अंगठ्या, हिऱ्यांच्या अंगठ्या, कडे असे खूप काही आहे. माझा मोबाईल आणि इतर गॅजेट्सवर सुद्धा सोन्याचे आवरण आहे. माझ्या मोबाईलचे कव्हर देखील सोन्याचे आहेत. माझ्या गाडीला सोन्याची रॅपिंग आहे. तसेच माझ्या बुटांवर देखील सोन्याचे काम केलेले आहे. आहि जो चष्मा वापरतो त्यावर देखील सोने लावलेले आहे. आमचे घड्याळ देखील सोन्याचे आहे, त्याच्या चैनी देखील सोन्याच्या आहेत."

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com