Bhoot Police | हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली फिल्म १७ सप्टेंबरला रिलीज होणार

हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली भूत पोलिस (Bhoot police) ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होत असून या सिमेनाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे.
Bhoot Police | हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली फिल्म १७ सप्टेंबरला रिलीज होणार
Bhoot Police | हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली फिल्म १७ सप्टेंबरला रिलीज होणारSaam Tv News

बहुप्रतिक्षित आणि मल्टास्टारर फिल्म भूत पोलिस (Bhoot Police) येत्या १७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम अशा मल्टी स्टारसह ही फिल्म रिलीज होत आहे. हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होत असून या सिमेनाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. (Bhoot Police | The horror and comedy film will be released on September 17)

पहा व्हिडिओ -

भूत पोलिस या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहून लक्षात येते की ही फिल्म हॉररसह प्रेक्षकांना खळखळूम हसवणारी देखील असणार आहे. यात सैफ, अर्जुन, जॅकलीन आणि यामी हे चोघेजण भुतांना पकडण्याचं काम करतात, त्यामुळे या सिनेमाचं नाव भुत पोलिस असावं. यातील कलाकारांनी सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम पेजवरुन शेयर केले आहे. ज्यात त्यांनी लिहीलं की, ''आता घाबरण्याची वेळ भूतांची आहे.'' त्यामुळे या हॉरर प्लस कॉमेडी फिल्मची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

पहा ट्रेलर -

खरंतर ही फिल्म थिएटर्समध्येच रिलीज करण्यात येणार होती, मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे ही फिल्म आता ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या थिएटर्स सुरु नसले तरी घरबसल्या तुम्हाला या फिल्मचा आनंद घेता येणार आहे.

Bhoot Police | हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेली फिल्म १७ सप्टेंबरला रिलीज होणार
Corona: आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना RTPCR चाचणी बंधनकारक

या मुव्हीमध्ये सैफ अली खानचं नाव विभूति, अर्जुन कपूरचं नाव चिरौंजी असणार आहे. तर यामी गौतमचं नाव माया आणि जैकलीन फर्नांडिसचं नाव कनिका असेल. वर्क फ्रॉम होममुळे किंवा कामाच्या तणावामुळे तुम्ही बोर झाला असाल तर काहीसं मनोरंजन म्हणून ही फिल्म तुम्ही नक्कीच बघू शकता.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com