Bhool Bhulaiyaa 3 OTT Release: रूह बाबाची जादू आता घरबसल्या अनुभवा, 'या' दिवशी ओटीटीवर दाखल

Bhool Bhulaiyaa 3 OTT Release Date: 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची डेट समोर आली आहे.
Bhool Bhulaiyaa 3 OTT Release Date
Bhool Bhulaiyaa 3 OTT ReleaseSAAM TV
Published On

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3 OTT Release) चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. 'भूल भुलैया 3'1 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'भूल भुलैया 3' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan ) , अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) , माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) मुख्य भूमिकेत आहेत. आता महिनाभरातच 'भूल भुलैया 3' चित्रपट घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

'भूल भुलैया 3' ओटीटी रिलीज

'भूल भुलैया 3' या चित्रपटचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. हा चित्रपट आता 27 डिसेंबरपासून तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. 'भूल भुलैया 3' ओटीटीवर आपली जादू दाखवायला आता सज्ज झाला आहे.

दिवाळीत बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3'ला अजय देवगणचा 'सिंघम अगेन' टक्कर देत होता. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले होते. 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ४२९.२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांनी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'ला मागे टाकले आहे.

'भूल भुलैया 3' हा भूल भुलैयाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाप्रमाणेच पहिल्या दोन्ही भागांना देखील चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले. तसेच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'भूल भुलैया ३' हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला आहे.

Bhool Bhulaiyaa 3 OTT Release Date
Pushpa 2 Box Office Collection Day 5: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा डंका, छप्परफाड कमाईचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com