Bhojpuri Actress Arrested: भोजपूरी अभिनेत्रीला देहविक्री प्रकरणी मुंबईतून अटक; कोण आहे अभिनेत्री, वाचा सविस्तर प्रकरण...

नुकतंच भोजपुरी अभिनेत्रीला वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
Bhojpuri Actress Arrested
Bhojpuri Actress Arrested Saam Tv

Bhojpuri Actress Arrested: झगमगत्या दुनियेतील सेलिब्रिटी आपल्या खासगी आणि पडद्यावरील आयुष्यामुळे कमालीचे चर्चेत असतात. त्यांची भूरळ खरंतर सर्वसामान्यांना नेहमीच पडते. पण या झगमगत्या जगाची काळी बाजू अनेकदा आपल्याला दुर्लक्षितच ठेवते. नुकतंच भोजपुरी अभिनेत्रीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे.

Bhojpuri Actress Arrested
Pushpa 2 Villain Role: आता जाळ अन् धुर संगटच... अल्लू अर्जूनसोबत ‘हा’ कलाकार दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

२४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी काल रात्री म्हणजेच २१ एप्रिल २०२३ रोजी अटक केली आहे. तिच्यावर मुलींना (मॉडेल) वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली असून सध्या पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याला वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. यानंतर कारवाई करत गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, त्याठिकाणी काही मॉडेल्स वेश्याव्यवसायासाठी पुरवल्या जात होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “ सिनेसृष्टीत या नवोदित महिला आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. सोबतच पोटाची खळगी भरण्यासाठी या नवोदित महिला कलाकार वेश्याव्यवसायाचे काम करत होते.” (Bollywood News)

Bhojpuri Actress Arrested
Maharashtra Shahir Look: असा घडला अंकुश चौधरी... दिग्दर्शक केदार शिंदेंनी शेअर केला 'महाराष्ट्र शाहीर'मधला शाहीर साबळेंच्या भूमिकेचा प्रवास

ही अभिनेत्री अनेक भोजपुरी सिनेमांत झळकली आहे. तिने लैला 'मजनू' आणि 'बाप नंबरी, बेटा दस नंबरी' सारख्या अनेक भोजपुरी सिनेमांत काम केलं आहे. ती एक अभिनेत्री असण्यासोबतच गायिकादेखील आहे. तिने भोजपुरी, हिंदीसह पंजाबी भाषेतील गाणी गायली आहे. ओटीटीवरील अनेक प्रोजेक्टमध्येदेखील काम केलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून अभिनेत्री मुंबईत राहत आहे. पण वेश्याव्यवसायात काम करायला तिने कधी सुरुवात केली हे अद्याप समोर आलेलं नाही.

अलीकडेच अभिनेत्री आरती मित्तलला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com