Dream Girl 2 Review: फुल्ल टू मनोरंजन... विनोदाची मेजवानी अन् बरंच काही; असा आहे आयुष्यमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’
Dream Girl 2 Review(3 / 5)
Dream Girl 2 Review
‘ड्रीम गर्ल २’ची कथा निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी एका फ्रेममध्ये सेट केल्याचे स्पष्ट दिसते. ‘ड्रीम गर्ल’ च्या कथेत निर्मात्यांनी जबरदस्त मनोरंजक कथा दाखवली होती. ‘ड्रीम गर्ल’च्या कथेचा सारांश असा आहे की, मथुरेत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय परिवारामध्ये राहणाऱ्या करमवीर सिंगची कथा आहे.
करमवीर सिंगचे पात्र आयुष्मान खुरानाने साकारले. करमवीर सिंग नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतो. अखेर त्याला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळते आणि ‘ड्रीम गर्ल’च्या कथेला सुरूवात होते. करमवीर चित्रपटामध्ये पूजा नावाचे पात्र काल्पनिक आहे.
निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपटामध्ये ‘ड्रीम गर्ल’ कोणत्या रूपात भेटेल याची शाश्वती दिलेली नाही. ही स्वप्नातली राजकुमारी प्रत्येकाला भेटावी अशी अनेकांच्या मनातली सुप्त इच्छा आहे. अशी ही ड्रीम गर्ल सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी चित्रपटाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (Bollywood)
करमवीर वडीलांनी काढलेलेले कर्जाचे हफ्ते फेडायचे आहे, या विचारामध्ये तो काम करत असतो. अशातच दुसऱ्या भागात करमवीर माहीच्या नाही तर परीच्या प्रेमात पडलेला असतो. ज्यावेळी परीचे वडील करमवीरसोबत लग्नाबद्दलची बोलणी करतात त्यावेळी त्यांना करमच्या वडिलांनी अनेकांकडून कर्ज घेतलेले आहेत, जे त्यांनी अजून परत केलेले नाहीत. ही गोष्ट कळते.
अशावेळी करमवीरला आपला जावई कसा काय करायचा? म्हणून जोपर्यंत त्याला नोकरी लागत नाही, त्याचे वडील घेतलेले सर्व कर्ज फेडत नाहीत, तोपर्यंत परीचे वडील (मोहन जोशी) परीचं लग्न करमवीरसोबत लावून द्यायला तयार होत नाहीत. त्यानंतर करमवीरला आणि त्याच्या वडीलांना कल्पना सुचते की, बारमध्ये मुलीच्या वेशात जाऊन करमवीर आपल्या वडीलांचे कर्ज फेडू शकतो. आणि सर्वांसमोर येते ड्रीम गर्लमधील पूजा.... (Bollywood Film)
चित्रपटाची कथा प्रेक्षकांना सुरूवातीला जास्त खुर्चीवर खिळवून ठेवत नाही. पण कथेमध्ये जसजसे पूजा आणि करमवीरच्या आयुष्यामध्ये अनेक उत्कंठावर्धक घटना घडतात तसतसा प्रेक्षक चित्रपटाच्या कथेत गुंतत जातो. त्यांच्या आयुष्यामध्ये चित्रविचित्र घटना घडायला लागल्या की नकळत त्याचं आपल्यालाच हसू वाटायला लागतं असं काहीसं करमवीरची 'पूजा' झाल्यानंतर होते. यानंतर एकेक पात्रं उलगडत जाते. पूजाची अधिकाधिक गोची होत जाते. मग खरी गंमतही उलगडत जाते. (Entertainment News)
ड्रीम गर्ल अनेकांना विविध रूपात भेटते. ही कशाप्रकारे भेटते हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. ‘ड्रीम गर्ल २’चे कथानक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ही कथा प्रेक्षकांना फारच भावते आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करताना दिसते. अनन्याचे पात्र मध्येच उडी घेतल्यासारखं वाटतं पण तिची भूमिका खूप भाव खाऊन जाते.
आयुष्यमान खुरानाच्या खांद्यावर संपूर्ण चित्रपटाची कथा असल्याचे दिसते. तोच या चित्रपटात नायक आणि नायिका असल्याने प्रेक्षकांचे सर्वात लक्ष त्याच्याकडे जाते. आयुष्यमानने पूजा या पात्रासाठी विशेष मेहनत घेतल्याचे स्पष्ट दिसतेय. त्यातूनच ही ड्रीम गर्ल प्रेक्षकांना प्रभावित करतेय. अनेकांच्या भूमिका कधी येतात आणि कधी जातात काही कळत नाही. पण जरी असे असले तरी, त्यांचे असणे चित्रपटासाठी प्लस पॉंईट असल्या सारखे दिसते.
सव्वा दोन तासांच्या चित्रपटात आपल्याला कुठेही बोअर होत नाही. राज शांडिल्य दिग्दर्शित चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आपल्याला हा विनोद चित्रपटच वाटेल. प्रसिद्ध अभिनेते असरानी, परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अनु कपूर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या अभिनयाने प्रेक्षक मनमुराद हसताना दिसत आहे.
‘मेरे दिल का टेलिफोन...’ या गाण्याव्यतिरिक्त सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांची निराशा केली. काही वेळ संथ वाटणारा चित्रपट हलका फुलका, निखळ मनोरंजन करणारा विनोदीपट ठरला आहे. जास्त विचार न करता, मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून चित्रपट पाहिला तर हा चित्रपट आपल्या खूपच विनोदी वाटतो. जर आयुषमान खुरानाचे चाहते असाल तर त्याने कशाप्रकारे पूजा साकारली आहे, हे पाहण्यासाठी एकदा आवश्य ‘ड्रीम गर्ल २’ पाहा...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.