Amitabh Bachchan: बिग बी शूटिंग दरम्यान जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हैदाराबाद येथे एका ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत.
Amitabh Bachchan Health Update
Amitabh Bachchan Health UpdateSaam Tv

Amitabh Bachchan Health Update: बिग बी अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हैदाराबाद येथे एका ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर शूटिंग देखील रद्द करण्यात आली आहे.

या अपघाताची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली असून हैदराबादमध्ये प्रोजेक्ट 'के'च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचे अभिनेत्याने सांगितले. ॲक्शन शॉट दरम्यान ही घटना घडली. अमिताभ यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. अमिताभ यांनी सांगितले की, रिब कार्टिलेज पॉप झाले आहे, उजव्या बाजुच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर शूटिंग थांबवण्यात आली आहे.

हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांचे सीटी स्कॅन करण्यात आले असून तपासणीनंतर बिग बी भारतात परतले आहेत. डॉक्टरांनी बिग बींना सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Amitabh Bachchan Health Update
Amruta Khanvilkar: बापरे काय झालं? अमृता खानविलकरने केलं सोशल मीडियाला बाय बाय?

अमिताभ बच्चन अनेक अडचणींचा सामना करत असून त्यांना झालेल्या दुखापतीचा फार त्रास होत आहे. तसेच हालचाल करण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर अपडेट शेअर केले आणि सांगितले की, दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com