Aamir Khan: आमिरची मुलगी आयरा खानचा झाला साखरपूडा, संपूर्ण कुटूंबाने लावली हजेरी

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्यातील नात्याची सुरुवात 2020 मध्ये झाली.
Ira Khan's Engagement:
Ira Khan's Engagement:Saam Tv

Ira Khan's Engagement: आमिर खानची मुलगी आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत नुकताच साखरपुडा झाला आहे. नुपूरने काही महिन्यांपूर्वी आयराला प्रपोज केला होता. या दरम्यानचा व्हिडिओ आयराने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता दोघांचा साखरपुडा ही झाला आहे. आमिर खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते.

यावेळी संपूर्ण खान कुटुंबाची छायाचित्रे समोर आले आहेत. आयरा लाल रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये दिसत होती, तर नुपूर शिखरे काळ्या रंगाचा सुट घालुन पापाराझींसाठी पोज देताना दिसत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर चांगलाच आनंद खुलून दिसत होता. सोबतच अमिर खानला कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दिसत होता.

Ira Khan's Engagement:
Urfi Javed Viral Video: उर्फी जावेदनं यावेळी हद्दच ओलांडली; अंतर्वस्त्राऐवजी लटकावले २ मोबाइल, पाहा VIDEO

लांबलचक दाढीमध्ये आमिर खानला ओळखणे सर्वांनाच कठीण होते. पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून आमिर खानने पापाराझींना पोज दिली आहे. डोळ्यांवर गॉगल घालून अमिर खूप वेगळा दिसत होता. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताही मुलीच्या साखरपुड्यासाठी स्टायलिश लूकमध्ये पोहोचली होती. क्रीम आणि पिवळ्या रंगाच्या साडीत रीना खूपच सुंदर दिसत होती. (Aamir Khan)

आयराच्या आई-वडिलांसोबतच तिचे भाऊ जुनैद खान, किरण राव आणि धाकटा भाऊ आझाद राव खानही या सोहळ्याला उपस्थित होते. आयराची आजी झीनत हुसैन आणि चुलत भाऊ इम्रान खान देखील या सोहळ्याला उपस्थित होते. आमिर खानच्या दोन बहिणी निखत आणि फरहत कार्यक्रमाला उपस्थित होत्या सोबतच अभिनेत्री फातिमा सना शेख हीने सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Family)

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्यातील नात्याची सुरुवात 2020 मध्ये झाली. नुपूर हा आयराचा जिम ट्रेनर होता. नुपूर शिखरेनेही आमिर खानला प्रशिक्षण दिल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आयरा आणि नुपूरने त्याच वेळी इन्स्टाग्रामवर आपल्या नात्याची अधिकृत माहिती जाहीर केली. (Celebrity)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com