Pushpa 2 Collection : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाने प्रस्थापित केलेले विक्रम सध्या कोणत्याही चित्रपटाला तोडणे अशक्य आहे. केवळ दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण भारतात पुष्पा दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अल्लू अर्जुनने पुष्पराजच्या रूपात पडद्यावर जी जादू निर्माण केली आहे त्याच्यावरचढ होणे बॉलीवूडमधील कोणत्याही अभिनेत्याला आता शक्य नाही.
पुष्पराजसाठी चाहत्यांना लागले पुष्पा २ चे वेड
रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने भरगोस कमाई करण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि आगाऊ बुकिंगसाठी तयार झालेला चाहत्यांचा उत्साह कायम आहे. त्यामुळेच पाहिल्यादिवसाच्या सकाळपासूनच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होऊ लागली, जे आपल्या आवडत्या पुष्पराजला पाहण्यासाठी उत्सुक होते.साऊथचे चित्रपट हिंदीत डब केले की काही दिवसातच ते उतरवले जातात, असे अनेकवेळा पाहायला मिळते. मात्र, पुष्पा २ चित्रपटगृहात येऊन १५ दिवस झाले असले तरी चित्रपटाची क्रेझ कमी होत नाहीये.
पुष्पा २ ने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत आधीच झेंडा रोवला आहे. या चित्रपटाने १४०० कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच तो १५०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. रिलीजच्या १४ दिवसांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असून दुसऱ्या बुधवारी २०.५५ कोटींची कमाई केली आहे. तर १५ व्य दिवशी म्हणजेच गुरुवारी या चित्रपटाने १०. ९५ कोटींची कमाई केली. अन्य दिवसांपेक्षा १५ व्य दिवशी झालेली या चित्रपटाची कमाई कमी असली तरी या चित्रपटाचे टोटल कलेक्शन ९८३.०९ कोटी झाले आहे. येत्या विकेंडला यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे, पुष्पा २ ने काही दिवसांत ९५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते, तर दुसरीकडे १००० कोटी रुपये जमवायला खूप वेळ लागत आहे. यासह, सध्या पुष्पा २ च्या आसपास कोणतेही मोठे रिलीज नाही. चित्रपटाला अजूनही भरपूर संधी आहे. आता त्याचा सामना २५ डिसेंबरला वरुण धवनच्या बेबी जॉनशी होणार आहे. नाना पाटेकर यांचा वनवास २० डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे पुष्पाच्या कलेक्शनमध्ये आणखी फरक पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.