मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) एका वर्षात अनेक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. ४० दिवसात शूटिंग पूर्ण करणे ही अक्षय कुमारची खासियत आहे. अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सिनेमा 'कठ्ठपुतली'(Cuttputlli) आज ओटीटी प्लॅटफॅार्मवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे अक्षयने २० दिवसांत या सिनेमाचे शूटिंग केले आहे. क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.
या चित्रपटाचे कथानक हिमाचलमधील कसौली या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. या सिनेमात तरुण मुलींच्या एकामागून एक हत्या होतात. सीरियल किलर मुलींना मारण्यापूर्वी त्यांचा चेहरा खराब करतो. तसेच बाहुलीचे डोके देखील सोडतो ज्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी अर्जुन सेठी (अक्षय कुमार) सिरीयल किलरला कसा पकडतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.
पोलीस स्टेशनमधील अंतर्गत चढा-ओढींना तोंड देत अक्षय कुमार सीरियल किलिंगचे हे प्रकरण सोडवण्यात गुंततो. परंतू, सीरियल किलरला पकडण्याच्या प्रयत्नात त्याची भाचीही सीरियल किलरची शिकार बनते. अशात काही लोकांमुळे त्याची दिशाभूल होते पण शेवटी तो या सीरियल किलरला पकडून प्रकरण सोडवतो.
'कठ्ठपुतली' या सिनेमात उत्तम स्टार कास्ट, उत्तम पंचिंग डायलॉग असूनही, प्रेक्षकांमध्ये या सिनेमासाठी फारशी उत्सुकता पाहायला मिळाली नाही. 'रत्सासन' या तमिळ सिनेमाचा रीमेक असल्यामुळे, तसेच बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड सुरु असल्यामुळे या सिनेमाकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत.
या सिनेमातील अनेक दृश हे 'फॉरेन्सिक्स' या मल्याळम चित्रपटातील असल्याचे बोलले जात आहे. 'फॉरेन्सिक' हा मल्याळम सिनेमा २०२० साली प्रदर्शित झाला होता. 'कठ्ठपुतली' हा सिनेमा मल्याळम सिनेमाचा रिमेक असल्याचा दावा केला जात आहे. पण निर्मात्यांनी 'कठ्ठपुतली' २०१८ च्या तमिळ सिनेमा 'रत्सासन'चा रिमेक असल्याचे म्हटले आहे. वास्तविक, हा सिनेमा 'रत्सासन' आणि 'फॉरेन्सिक्स' या दोन्ही साउथ सिनेमांचा रीमेक आहे. म्हणूनच या सिनेमाचे जास्त प्रोमोशन न करता अक्षय कुमार आणि निर्मात्यांनी डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा प्रदर्शित केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.