Gau Nako Krishna New Song: 'गाऊ नको किसना...' 'चंद्रा' फेम जयेश खरेच्या दमदार आवाजाने सजलेलं 'महाराष्ट्र शाहीर'मधील नवीन गाणं व्हायरल

Maharashtra Shaheer New Song: शाहीर साबळे यांचे बालपण 'गाऊ नको किसना...'मधून उलघडणार.
Maharashtra Shaheer New Song Gau Nako Krishna
Maharashtra Shaheer New Song Gau Nako KrishnaSaam TV

Ajay-Atul New Song: शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नातू केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

'गाऊ नको किसना' असे या गाण्याचे नाव आहे. ‘चंद्रा’ गाण्याने सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या जयेश खरे याने आहे गाणे गायले आहे. या गाण्याच्या माध्यमातून शाहीर साबळे यांचे बालपण उलघडण्याचा प्रयत्न केदार शिंदे यांनी केला आहे.

Maharashtra Shaheer New Song Gau Nako Krishna
Urmi Trailer Launch: प्रेयसीच्या येण्याने चिन्मय उदगीरकरच्या वादळ येणार; "उर्मी" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'आईचा धाक आणि गाण्याची हाक, भजन-कीर्तन, भारुडं, ओव्यांमध्ये रमणाऱ्या लहानग्या किसनाचं, 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातील नवं गाणं 'गाऊ नको किसना'..' असं कॅप्शन देत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

शाहीर साबळे म्हणजेच छोटा किसना आईपासून लपत गाणं गातोय. जेव्हा त्याची आई समोर येते तेव्हा गावातले गावकरी त्याला 'गाऊ नको किसना' असं सांगत असतात. हे गाणं खूप सुंदर आहे. ऐकण्यासह हे गाणं पाहण्यात देखील एक वेगळी गंमत तुम्हाला येईल.

प्रदर्शित झाल्यानंतर काही तासात हे गाणे व्हायरल झाले आहे. अजय-अतुल यांनी हे गाण्याला संगीत दिले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय-अतुल आणि केदार शिंदे अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. या चित्रपटातील 'बहराला मधुमास' हे गाणे देखील खूप व्हायरल झाले. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर रील्स बनवत आहेत.

'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अंकुश चौधरी या चित्रपटामध्ये शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com