Priya Bapat News : 'सिटी ऑफ ड्रिम्स ३' ची प्रिया बापट पुन्हा येतेय; म्हणाली, माझ्या करिअरमधील...

Priya Bapat's New Webseries : अभिनेत्री प्रिया बापट हिनं प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकुनूर याचं कौतुक केलं आहे.
Priya Bapat News
Priya Bapat NewsSaam Tv

Priya Bapat on Her New Webseries : टाइमपास २ फेम अभिनेत्री आणि सिटी ऑफ ड्रीम्स या बेवसीरीजमधील बोल्ड सीनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री प्रिया बापट हिनं प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकुनूर याचं कौतुक केलं आहे. 'सिटी ऑफ ड्रिम्स ३' या नवीन वेबसीरीजमधून प्रिया पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या वेबसीरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

अभिनेत्री (Actress) प्रिया बापटने तिची नवीन वेबसीरीज (Webseries) 'सिटी ऑफ ड्रिम्स ३'च्या दिग्दर्शकाचे कौतुक केले. ही वेबसीरीज नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केली आहे. प्रिया बापट ही या वेबसीरीजमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स ३'चे दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांचं कौतुक करताना प्रिया म्हणाली की, "एक कलाकार म्हणून त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी माझ्या आयुष्यावर प्रभाव निर्माण केला आहे, असे जाणवते."

Priya Bapat News
City Of Dreams Season 3: 'सिटी ऑफ ड्रीम्स'चे कलाकार सिद्धिविनायकाच्या चरणी

'आयएएनएस'शी संवाद साधताना ती म्हणाली की, "नागेश सरांचा माझ्या आयुष्यावर कलाकार म्हणून प्रभाव आहे. त्यांच्यासोबत काम करणे ही माझ्या करिअरमधील सर्वोत्तम गोष्ट आहे. ही माझ्यासाठी मला मी नव्याने शोधण्याची संधी होती. यात सरांनी माझ्यातील काही नवीन बदल आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख करून द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी पात्रासाठी काही नवीन गोष्ट करण्याची आवश्यकता नाही याची जाणीव करून दिली. त्यामुळेच तर सीन कोणत्यातरी वेगळ्या पद्धतीने सुरू व्हायचा आणि कुठेतरी अनपेक्षित ठिकाणी येऊन संपायचा. पात्रांचा आराखडा हा वेगळा असल्याने खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या."

Priya Bapat News
City Of Dreams 3 Teaser: ‘तुम्हारा साहेब अभी रिटायर नहीं हुआ है...’सिटी ऑफ ड्रीम्सचा आगामी सीझन येणार; चर्चा तर होणारच...

अद्भूत अनुभव...

"तुमच्या मागे जेव्हा खूप चांगले हात काम (Work) करत असतात, तेव्हा एक खात्री असते की आपलं कामं योग्य मार्गाने सुरू आहे. त्यांच्यासोबत काम करणं हा एक अद्भुत अनुभव आहे. तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

कॅमेऱ्यात काय दिसतं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट असते. या सगळ्या गोष्टींकडेही सरांचे लक्ष असते. नागेश सर नेहमी तालमीला उपस्थित राहायचे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचे. यापेक्षा समृद्ध करणारा अनुभव नाही," अशी प्रतिक्रियाही प्रियाने दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com