Priya Bapat: नाट्यगृहाची परिस्थिती पाहून प्रिया बापट संतापली, नाट्यरसिकांचीच केली कानउघडणी

Priya Bapat News: प्रिया बापट आणि उमेश कामतच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा शो होता. यावेळी नाट्यगृहातील परिस्थिती पाहून प्रिया बापट प्रेक्षकांवर चांगलीच संतापली आहे.
Priya Bapat Angry On Audience
Priya Bapat Angry On AudienceSaam Tv
Published On

Priya Bapat Angry On Audience

गेल्या काही दिवसांपूर्वी नाट्यगृहातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले होते. नाट्यगृहातील साफसफाई, तेथील व्यवस्थेसह अनेक मुद्दे त्यावेळी उपस्थित झाले होते. अशातच पुन्हा एकदा नाटकातील साफसफाईवर प्रश्न उपस्थित झाला आहे. जितका प्रतिसाद मराठी चित्रपटांना मिळतो, तितकाच प्रतिसाद मराठी नाटकांनाही मिळताना दिसत आहे. नुकताच प्रिया बापट आणि उमेश कामतच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा पुण्यामध्ये शो होता. नाट्यगृहातील परिस्थिती पाहून प्रिया बापट 'काही अंशी प्रेक्षक देखील जबाबदार आहेत,' असं म्हणत ती प्रेक्षकांवर संतापली आहे.

Priya Bapat Angry On Audience
Pooja Bhatt Support Mannara Chopra: मन्नारा की मुनव्वर; पूजा भट्ट नक्की कोणाला सपोर्ट करतेय?, अभिनेत्रीने खरं कारण ही सांगितलं...

सध्या प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघेही 'जर तरची गोष्ट' या नाटकाच्या शोमुळे बरेच व्यग्र आहे. नुकताच त्यांच्या नाटकाचा पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये शो होता. यावेळी नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांनी केलेला कचरा पाहून ती चांगलीच संतापली आहे. तिने हा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर करत लिहिले की, ‘नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?’ असं म्हणून तिने आपला संताप व्यक्त केला आहे.

Priya Bapat Angry On Audience
Kriti Sanon Gets Golden Visa: क्रिती सेनेनचा युएई सरकारकडून खास गौरव; अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...
Priya Bapat Angry On Audience
Priya Bapat Angry On AudienceInstagram

या शेअर केलेल्या फोटोमध्ये, नाट्यगृहात प्रेक्षकांनी केलेला कचरा पाहायला मिळतोय. फोटोमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाऊची पाकिटं, चहाचे कप आणि इतर कचरा पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांनी केलेला हा कचरा पाहून प्रिया बापट चांगलीच संतापली आहे. तिने या सगळ्यासाठी प्रेक्षकांनाच जबाबदार ठरवले आहे. नाटक पाहायला येणाऱ्या नाट्य रसिकांचं हे वागणं बरोबर आहे का?, असा प्रश्न तिने उपस्थित केलाय.

अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.

Priya Bapat Angry On Audience
Ashwini Mahangade: मनोज जरांगे पाटलांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट; म्हणाली, "या माणसाने..."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com