Aditi Dravid- Saavni Ravindra Reel: रणवीर- आलियाच्या ‘व्हॉट झूमका’वर मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला अस्सल ठुमका, हुक स्टेपने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

What Jhumka Song Viral Reel: सोशल मीडियावर दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी हटक्या पद्धतीने ‘व्हॉट झूमका’ जबरदस्त हूक स्टेप करत डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
Aditi Dravid- Saavni Ravindra What Jhumka Reel
Aditi Dravid- Saavni Ravindra What Jhumka ReelSaam Tv

Aditi Dravid- Saavni Ravindra What Jhumka Reel

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या कथेप्रमाणेच चित्रपटातील गाणी ही बरेच चर्चेत आहेत. ‘झूमका गिरा रे’ चं न्यू व्हर्जन असलेले, ‘व्हॉट झूमका’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओ बनवून शेअर केल्या आहेत. नुकताच सोशल मीडियावर दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी हटक्या पद्धतीने ‘व्हॉट झूमका’ जबरदस्त हूक स्टेप करत डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Aditi Dravid- Saavni Ravindra What Jhumka Reel
Elvish Yadav: पुन्हा एकदा सिस्टम हँग होणार; Bigg Boss 17 मध्ये झळकणार एल्विश यादव ?

सध्या सोशल मीडियावर बराच ट्रेंडिंगवर राहिलेल्या या गाण्याची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा आहे. नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्री आदिती द्रविड आणि गायिका सावनी रवींद्र या दोघींनाही ‘व्हॉट झूमका’वर रील करण्याचा मोह आवरलेला नाही. विशेष बाब म्हणजे, दोघींनीही नऊवारी साडी परिधान करून गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. पूर्णपणे मराठमोळा लूक करून सुंदर डान्स केलेला आहे. सध्या या दोघींच्याही डान्सची तुफान चर्चा होत आहे. रीलवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

‘व्हॉट झूमका’चा व्हिडीओ गायिका सावनी रवींद्रने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, सावनीने “Because We HAD to do मराठमोळा ‘झूमका’ ” अशा आशयाचं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला. दरम्यान, सावनी रवींद्र आणि आदिती द्रविड या दोघीही सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे कमालीचे चर्चेत आहे. चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणं आदिती द्रविडने लिहिलं आहे तर, सावनी रविंद्रने गायलं आहे. त्या गाण्याची देखील सर्वत्र चर्चा होते.

Aditi Dravid- Saavni Ravindra What Jhumka Reel
Kishor Kadam Post: 'टोलच्या नावाखाली लोकांची लूट...' मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे टोलवर कवी सौमित्रची पोस्ट चर्चेत

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’बद्दल सांगायचे तर, चित्रपटात प्रमुख भूमिकेत आलिया आणि रणवीर सोबतच, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्या सोबत मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले असून निर्मिती करण जोहर, हिरो जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण १४७. ७५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com