
Gashmeer Mahajani With Pooja Sawant : मराठीतील अॅक्शन हिरो म्हणून अभिनेता 'गश्मीर महाजनी' प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपट आणि आता हिंदी मालिकातून गश्मीर सर्वाचं मनोरंजन करत आहे. गश्मीर आज त्याचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याचा वाढदिवस खूप भन्नाट पद्धतीने साजरा केला आहे. केक कापताना गश्मीर भलताच आनंदात दिसत आहे.
गश्मीर नेहमीच डान्स आणि अॅक्शनमुळे चर्चेत असतो. 'कान्हा' असो वा 'कॅरी ऑन मराठा' गश्मीरने चित्रपटातून स्वतःला सिद्ध केलं आहे. गश्मीर सध्या 'तेरे इश्क मे घायाल' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या 'इमली' या हिंदी मालिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली.
गश्मीर नेहमीच त्याच्या हटके लुकमुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. तो त्याचे फोटोज् सोशल मीडियावर शेअर करताना नेहमीच दिसत असतो. (Latest Entertainment News)
गश्मीरने मित्रमैत्रिणींसोबत साजरा केला वाढदिवस
गश्मीरने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो केक कापताना दिसत आहे. त्याच्या बाजूला त्याचा मित्र-परिवार आणि पत्नी दिसत आहे. व्हिडिओत गश्मीर केक कापताना दिसत आहे. केक कापताना सगळेजण 'करण-अर्जून' या सुपरहिट चित्रपटातील 'मुझको रानाजी माफ करना' हे गाताना दिसत आहेत.
हे गाणे गाताना तो एक्सप्रेशन देत डान्स देखील करत आहे. तसेच या गाण्यावर त्याने केक देखील कापला आहे. या गाण्याचा पुरेपुर आनंद घेत तो त्याच्या वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
गश्मीरने सहारे केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी गौरी देशमुख, अभिनेत्री पुजा सांवत, सौमिल शृंगापूरे, रुचिरा सावंत आणि श्रेय सावंत देखील दिसत आहेत. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेक सेलिब्रिटी, त्याचे सहकलाकार आणि चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कमेंट करत आहेत.
गश्मीर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या भेटीला आला आहे. त्याने 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. सध्या गश्मीर हिंदी मालिकांमध्ये सक्रिय आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.