Krutika Dev In Taali Web Series: गौरी सावंतच्या बालपणाचे पात्र साकारणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; ट्रेलरमधून समोर आली झलक
Krutika Deo Play Role Of Young Gauri Sawant: रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या ‘ताली’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वेबसीरीजमध्ये गौरी सावंत यांच्या लहान वयातील भूमिकेत एक मराठमोळी अभिनेत्री दिसत आहे.
वेबसीरीजमध्ये तृतीयपंथीयांच्या कार्यासाठी झटणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुष्मिता सेन दिसणार आहे. गौरी सावंत यांच्या प्रमुख भूमिकेत सुष्मिता सेन आहे, तर बालपणातील भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री कृतिका देव गौरी सावंत यांच्या बालपणातील भूमिका साकारतेय. कृतिका देव ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिनेता अभिषेक देशमुखच्या पत्नीचे पात्र साकारले आहे.
येत्या १५ ऑगस्टपासून ही वेबसीरीज ‘जिओ सिनेमा’वर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ असून गौरी सावंत यांच्या बालपणाची भूमिका कोण साकारणार याचं उत्तर अखेर प्रेक्षकांना मिळालं आहे. गौरी सावंत यांच्या बापलपणाची भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री कृतिका देव साकारतेय. तिने मालिकेआधी काही मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही महत्वाचे पात्र साकारले होते. अभिनेत्रीला खरी ओळख ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतूनच मिळाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आणि ट्रान्सजेंडर वर्कर गौरी सावंतने तृतीयपंथीय समाजासाठी अनेक महत्वाचे काम केले आहेत. गौरी सावंत यांचे संपूर्ण जीवन आता वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. गौरी सावंतच्या आयुष्यात आलेले चढउतार, समाजात मिळणारी वागणूक आणि गणेश ते गौरी सावंत असा धाडसी प्रवास आपल्याला वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
‘ताली’ वेबसीरीजमध्ये गौरी सावंतच्या लहानपणाच्या भूमिकेत अभिनेत्री कृतिका देव दिसत आहे, तर प्रमुख भूमिकेत सुष्मिता सेन दिसत आहे. येत्या १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी वेबसीरीजचे लेखन केले आहे. अर्जुन सिंह बारन, कार्तिक डी निशानदार आणि अफीफा सुलेमान नाडियाडवाला यांनी या वेबसीरीज निर्मिती केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.