Eknath Khadse News: वडिलांनंतर मुलीच्या भूमिकेकडे लक्ष! रोहिणी खडसे काय निर्णय घेणार?

Rohini Khadse Jalgaon News Today: एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. खडसेंसोबत त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse in BJP) यांनी भाजपची वाट धरल्यामुळे रोहिणी खडसे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन रोहिणी खडसे (Rohini Khadse) भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्या नेमकं काय बोलणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा भाजपची वाट धरल्यामुळे एकनाथ खडसे चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगावचं राजकारणही (Jalgaon News Today) चर्चेत आलंय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. खडसेंसोबत त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेल्या रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आलं होतं. दरम्यान, आता वडिलांनी घेतलेल्या राजकीय निर्णयानंतर मुलगी रोहिणी खडसे काय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com