KDMC News: प्रसुतीनंतरच्या उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; डॉक्टरांचा हलगर्जीपणा, कुटुंबीयांचा आरोप

Pregnant Woman Died In Dombivali Hospital: डोबिंवलीच्या सरकारी रुग्णालयात एका महिलेचा प्रसुतीनंतरच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला. कुंटुंबियाने डॅाक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
KDMC News
Pregnant Woman Died In Dombivli HospitalSaam tv
Published On

अभिजित देशमुख, साम प्रतिनिधी

Kalyan Dombivli: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुग्णालय कायमच वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असतं. आता पुन्हा एका घटनेने डोंबिवलीतील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतरच्या उपचारादरम्यान एका 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. परंतु डॅाक्टरांनी अशा प्रकारच्या आरोपाचे खंडन केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीतील अविनाश सरोदे यांच्या 26 वर्षीय पत्नी सुवर्णा सरोदे यांना 11 तारखेला डिलिव्हरीसाठी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 तारखेला त्यांना प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र डिलिव्हरीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांचा गर्भाशय काढण्यात आला, मात्र या उपचारादरम्यान सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. सुवर्णा सरोदे यांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप डॉक्टरांनी मात्र फेटाळून लावलेत. आपण महिलेचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले,असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

KDMC News
Dhule Crime : बसमधून महिलेचे दागिने चोरी; महिला आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

रुग्णालय प्रशासनाचं मत

डॉक्टरांच्या मते, हा निर्णय त्यांचा जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला. मात्र, कुटुंबीयांचा आरोप आहे की, ही प्रक्रिया करण्यासाठी त्यांची परवानगी घेतली नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच सुवर्णा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. जवळपास तासभर रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण होते.

अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रक्तस्त्राव अत्यंत वाढल्याने सुवर्णाला वाचवण्यासाठी गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी सुर्वणा यांचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तिचे प्राण वाचवण्यात अपयश आले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आरोप निराधार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सखोल चौकशीची मागणी

कुटुंबाचा आरोप आहे की, डॉक्टरांनी त्यांच्या परवानगीशिवाय ऑपरेशन करून महिलेला गंभीर परिस्थितीत ढकलले आणि त्यानंतर सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास पुढील आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेने कल्याण-डोंबिवलीत आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीच्या मोठ-मोठ्या घोषणा करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका किमान चांगल्या आरोग्याच्या सुविधा नागरिकांना पुरवू शकत नाहीत, अशी खंत कायमच नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

KDMC News
Crime News : बायकोची पापणी कापली, प्रायव्हेट पार्टवर सपासप वार, अफेअरच्या संशयातून छोटू पेटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com