
चैत्र नवरात्रीमध्ये देवी आईची पुजा करण्यात येते. या निमित्त ९ दिवस उपवास केला जातो. विशेषतः महिला चैत्र नवरात्रीच्या दिवसात देवी मातेची पुजा करण्यात व्यस्त असतात. परंतु, उत्तर प्रदेशमधील झाशी येथून चैत्र नवरात्रीनिमित्त समोर आलेला मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.
एका महिलेला चैत्र नवरात्री सुरू होण्यापूर्वीच मासिक पाळी आली. या कारणास्थ ती महिला देवीची पुजा करू शकली नाही. महिला देवी आईची खूप पुजा भक्ती भावाने करत असे. वर्षभर चैत्र नवरात्रीची वाट पाहत असे. परंतु यंदा चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या महिलेला मासिक पाळी आली त्यामुळे ती महिला इतकी अस्वस्थ झाली की तिने खूप मोठे टोकोचे पाऊल उचलले.
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चैत्र नवरात्रीच्या उपवास आणि पूजा करू न शकल्याच्या दुःखातून एका महिलेने विष प्राशन केले, ज्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना झाशीच्या सिटी कोतवाली परिसरातील असलेल्या पन्ना लाल गोला कुआं भागात घडली. ३६ वर्षीय प्रियांशा सोनी आपल्या पती मुकेश सोनीसोबत येथे राहत होती. त्यांना दोन लहान मुली होत्या, ज्यांचे वय ४ वर्षांपेक्षा कमी होते.
मुकेशने सांगितले की, त्याची पत्नी प्रियांशा चैत्र नवरात्रीच्या सणाबद्दल खूप उत्साहित होती. तिने पूजेची तयारी खूपआधीच सुरू केली होती आणि मुकेशही तिला पूर्ण पणे पाठिंबा देत होता. पण चैत्र नवरात्र सुरू होण्याच्या दिवशीच प्रियांशाला मासिक पाळी आली. त्यामुळे ती उपवास करू शकली नाही.
दुसऱ्या दिवशी मुकेश आपल्या दुकानात गेला असताना, प्रियांशाने घरी विष प्राशन केले. ही बातमी मिळताच कुटुंबीयांनी तिला झाशी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे उपचारानंतर तिची प्रकृती थोडी सुधारली. त्यानंतर मुकेश तिला घरी घेऊन आला. मात्र, घरी पोहोचल्यावर तिची प्रकृती पुन्हा बिघडली, आणि तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले, पण या वेळी तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस सर्कल ऑफिसर नगर स्नेह तिवारी यांनी सांगितले की, सदर घटनेची चौकशी सुरू असून आवश्यक कारवाई केली जात आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.