उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने शहरात सुरू असलेल्या एका डान्स बारवर धाड मारून 23 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात आठ बारबाला तर 15 ग्राहकांचा समावेश आहे. दरम्यान उल्हासनगर शहरांमध्ये अनेक डान्स बार असून हे डान्स बार रात्रभर सुरू असतात अशा तक्रारी सातत्याने वाढू लागल्या आहेत. पाेलीसांनी अशा डान्स बारवर कारावाई करावी अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे. (Maharashtra News)
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर परिसरात असलेल्या डब्ल्यू,डब्ल्यू,एफ या डान्स बारवर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अचानक धाड मारली.
यावेळी डान्स बार मधील आठ बारबाला तसेच मद्यप्राशन करण्यास आलेले 15 ग्राहकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान उल्हासनगर शहरांमध्ये अनेक डान्स बार असून हे बार रात्रभर सुरू असतात. या डान्स बारवर पोलीस कधी कारवाई करतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.