Nanded Crime News : गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूससह युवकास अटक

Nanded Latest Marathi News : पाेलिसांच्या पथकाने छापा टाकत युवकास ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या जवळ एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले.
nanded police arrests youth along with pistol
nanded police arrests youth along with pistol saam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेड येथे गावठी पिस्टल मोठ्या प्रमाणात आढळून येतं आहे. पाेलिसांच्या कारवाईत सातत्याने शस्त्र साठा आणि विक्री हाेत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (ता. 27 मार्च) उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने एका इसमाला गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूससह ताब्यात घेतले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीवायएसपी सुशीलकुमार नायक यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुशील गावखोरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. सिडको भागातील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे एका इसमाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती डीवायएसपी सुशीलकुमार नायक यांना मिळाली हाेती. (Maharashtra News)

nanded police arrests youth along with pistol
Palghar Crime News: प्रेयसीची हत्या करणाऱ्या युवकास पश्चिम बंगालमधून अटक, डहाणू पोलिसांची कारवाई

त्यानंतर पथकाने छापा टाकत या इसमास ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या जवळ एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

nanded police arrests youth along with pistol
Sant Tukaram Beej 2024 : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत लाखाे भाविक दाखल, मावळातील ओवळेतून दिंडीचे प्रस्थान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com