Pimpri Chinchwad News : खून करून मृतदेह जाळला, मोबाईल पाठवला गोव्याला; पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला दृष्यम स्टाईल खूनाचा पर्दाफाश

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंडवड पोलिसांनी अलीकडे दहा दिवसात एका प्रकरणाचा छडा लावला आहे, ज्यात दृष्यम स्टाईलने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad News Saam Digital

Pimpri Chinchwad News

अजय देवगनचा २०१५ मध्ये दृष्यम चित्रपट आला होता. सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात, चित्रपटातील नायकाने आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी खुनाचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी जी पद्धत वापरली, त्या पद्धतीमुळे जवळपास ९ वर्षांनंतरही प्रेक्षकांना या चित्रपटाचं तितकंच कुतूहल आहे. हे काल्पनिक आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र अलीकडे या काल्पनिक कथानकांचा वापर वास्तविक जीवनात होऊ लागला आहे. पिंपरी चिंडवड पोलिसांनी अशाच एका प्रकरणाचा छडा लावला आहे, ज्यात दृष्यमप्रमाणेच खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दृष्यमधल्या नायकाविरोधात आजही पोलीस ठोस पुरावे देऊ शकले नाहीत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी मात्र अवघ्या १० दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

16 मार्चला महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतून आदित्य युवराज भंगारे या 18 वर्षाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी आदित्य भंगारे याचं अपहरण केल्यानंतर गळाआवडून आखून करून त्याचा मृतदेह महाराष्ट्र गुजरात सीमेवरवरील एका गावा जवळीत जंगलात जाळला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा मोबाईल गोवा राज्यात पाठवून दिला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमर नामदेव शिंदे या आरोपीला अटक केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpri Chinchwad News
Mumbai Crime News : पोलीस असल्याचं सांगत थेट कारवर डल्ला; पोलिसांकडून चोरट्यांचा पर्दाफाश

माळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसापूर्वी रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार राहुल संजय पवार याचा भाऊ रितेश संजय पवार याचा खून करण्यात आला होता. रितेश संजय पवार याचा खून झाल्यानंतर आदित्य भंगारे याने त्याच्या खुण्याचे छिन्न - विच्छिन्न छायाचित्र आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवलं होतं. याचाच राग मनात धरून राहुल संजय पवार यांने आदित्य भंगारे याचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी त्याने अमर नामदेव शिंदे आणि त्याच्या इतर काही साथीदाराच्या मदतीने आदित्य भंगारे याचं आधी अपहरण केल आणि नंतर त्याचा खून केला. खून केल्यानंतर पोलीसाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी दृश्यम चित्रपटातील खुनाच्या पद्धतीचा वापर केल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. या प्रकरणात सध्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमर नामदेव शिंदे या आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य सूत्रधार आरोपी आणि त्याचे काही सहकारी आरोपी अजूनही फरार आहेत.

Pimpri Chinchwad News
Chhattisgarh : दारू प्यायलेल्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी शिकवला धडा; चपलांनी मारहाण करत शाळेबाहेर पळवून लावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com