GST Fraud News: बनावट जीएसटी नोंदणी मिळवून 31 कोटींची फसवणूक, पालघरमध्ये एकाला अटक

Palghar Crime News: बनावट जीएसटी नोंदणी मिळवून सरकारी तिजोरीची 31.06 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि सीई पालघर आयुक्तालयाने एकाला अटक केली आहे.
GST Crime News
GST Crime NewsSaam Tv

>> हिरा ढाकणे

Palghar Crime News:

बनावट जीएसटी नोंदणी मिळवून सरकारी तिजोरीची 31.06 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि सीई पालघर आयुक्तालयाने एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13.39 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट (आयटीसी) मंजूर करण्याच्या उद्देशाने विविध मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या आधारे बनावट जीएसटी नोंदणी करण्याच्या आणि प्राप्तकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी 17.66 कोटी रुपयांच्या चुकीच्या आयटीसीचा लाभ घेणाऱ्या टोळीचा पालघर आयुक्तालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार मिश्रीलाल रामधर दुबे उर्फ अब्दुररहमान दुबे उर्फ अकील एच कासमनी याला गेल्या शुक्रवारी (8 मार्च 2024) अटक करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

GST Crime News
Mumbai News: महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारलं जाणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासादरम्यान, मिश्रीलाल रामधर दुबे उर्फ अब्दुर रहमान दुबे उर्फ अकील एच कासम हा त्याच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अंतर्गत विविध बनावट कंपन्या तयार करण्यात आणि बनावट पावत्या तयार केल्या.  (Latest Marathi News)

तसेच भरणा करून बनावट आयटीसी मंजूर करण्यासाठी तयार केलेल्या जीएसटीआयएनएसचा वापर करण्यात तसेच कमिशनच्या आधारावर अशा पावत्यांच्या विविध प्राप्तकर्त्यांना बनावट आयटीसी मंजूर करण्याच्या एकमेव हेतूने जीएसटीआर-1 परतावा भरण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे निदर्शनास आले. या उद्देशासाठी मिश्रीलाल रामधर दुबे एकूण 31 कंपन्या चालवत होता.

GST Crime News
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले? बीड आणि कोल्हापूरमध्ये कोणाला मिळणार संधी? पाहा लिस्ट

तपासादरम्यान गोळा केलेल्या प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे, मिश्रीलाल रामधर दुबे याला 8 मार्च 2024 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com