Crime News: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, नराधम दीपक वर्माचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Uttar Pradesh Police: उत्तर प्रदेशमध्ये ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं. पण अटक करत असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.
Crime News: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, आरोपी दीपक वर्मा एन्काऊंटरमध्ये ठार
Uttar Pradesh Crime Saam Tv
Published On

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आलमबाग परिसरात ३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाला होता. ४ जून रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले होते. या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली होती. आरोपींवर १ लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. आरोपीला पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आलमबाग मेट्रो स्ट्रेशन पुलाखाली ही घटना घडली. नवरा-बायको आपल्या ३ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन झोपले होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपी दुचाकीवरून त्याठिकाणी आला. त्याने चिमुकलीचे तोंड दांबून तिला तिथून उचलून नेले. मेट्रो पुलाखालीच त्याने चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी चिमुकलीला तिथेच गंभीर अवस्थेत सोडून पळून गेला होता.

Crime News: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, आरोपी दीपक वर्मा एन्काऊंटरमध्ये ठार
Kolhapur Crime : हॉलपासून किचनपर्यंत रक्ताचा सडा, चाकू बरगड्यांमध्येच अडकला, मृत्यूनंतरही समिक्षाला लाथा मारल्या; कोल्हापूर हत्याकांडाचा थरारक शेवट

पोलिसांना घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दुचाकीवरून आलेल्या आरोपीची ओळख पटली. दीपक वर्मा असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी १ लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली होती. पोलिसांनी दुचाकीचा नंबर देखील ट्रॅक केला.

Crime News: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, आरोपी दीपक वर्मा एन्काऊंटरमध्ये ठार
Crime : कामाच्या निमित्तानं बोलावलं अन्...; मदरशातच शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, मदरसा संचालकाचं धक्कादायक कृत्य

अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला शोधून काढले पण त्याला अटक करत असताना पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. डीसीपी सेंट्रल आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणात आलमबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आलमबाग व्हीव्हीआयपी रोडवर आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला. ऐशबाग परिसरातील रहिवासी असलेला आरोपी दीपक वर्मा रेल्वेमध्ये पाणी विकण्याचे काम करत होता.

Crime News: ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, आरोपी दीपक वर्मा एन्काऊंटरमध्ये ठार
Dharashiv Crime : 'दाढी-कटिंग उधार कर, पैसे नाहीत'; नकार दिल्यानं राग अनावर, हातातील कड्यानं डोक्यावर वार; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com