Crime News: घरबसल्या लाखो रुपये कमवा', फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकू नका, १०० वेबसाईट्सवर सरकारची कारवाई

Cyber Crime News: घरबसल्या पार्ट टाईम काम करा आणि लाखो रुपये कमावे, असं सांगून नोकरीची ऑफर देणाऱ्या अनेक जाहिराती तुम्ही देखील पाहिल्या असतील.
Cyber Crime News
Cyber Crime NewsSaam Digital
Published On

Cyber Crime News

घरबसल्या पार्ट टाईम काम करा आणि लाखो रुपये कमावे, असं सांगून नोकरीची ऑफर देणाऱ्या अनेक जाहिराती तुम्ही देखील पाहिल्या असतील. मात्र अलीकडेच केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑनलाईन पार्ट टाईम कामाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जवळपास १०० हून अधिक वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी कायदा अंतर्गत बंद करण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime News
#Shorts : Pune Cyber Crime News | पुण्यात सायबर चोरट्याकडून 50 लाखांचा गंडा

इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C)ने अशा १०० हून अधिक वेबसाइट शोधल्या होत्या. ज्यामध्ये लोकांची आमीष दाखवून फसवणूक केली ज आहे. या सर्व साईट्स ब्लॉक करण्याची शिफारस I4C ने केली आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने 'माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत' या सर्व साइट बंद केल्या आहेत.

लोकांची फसवणूक करणाऱ्या काही वेबसाईट परदेशातून चालवल्या जात होत्या. तसेच लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक डिजिटल जाहीराती, चॅट मेसेंजर आणि फेक अकाउंटचा वापर करत असत. फसवणुकीतून आलेली पैशांची रक्कम कार्ड नेटवर्क , क्रिप्टो करन्सी ,विदेशी एटीएममधून काढत असत.

कशी व्हाययची लोकांची फसवणूक?

परदेशातून फसवणूक करणारी टोळीकडून सोशल मीडियावर अनेक भांषामध्ये डिजिटल जाहिराती दिल्या जातात. लोकांना आकर्षित करण्यासाठी ‘घरबसल्या काम करा आणि पैसे कमवा' अशी वाक्य वापरली जाच असत. या जाहिरांतीवर क्लिक केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या टोळीतील व्यक्ती त्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर संवाद साधतो.

तसेच व्हिडीओला लाईक आणि सब्सक्राइब करणे, असे काम करण्यास सांगतो. काम पूर्ण केल्यानंतर टार्गेटेड व्यक्तील सुरुवातीला काही कमिशन दिले जाते. तसेच, एखाद्याला अधिकचे पैसे कमावण्यासाठी पैसे गुंतवण्यास सांगितले जाते. जेव्हा पीडित व्यक्ती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो तेव्हा पैसे घेऊन त्या व्यक्तीशी संपर्क तोडला जातो.

फसवणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?

खूप जास्त कमिशन ऑफर करणार्‍या कोणत्याही योजनेत ऑनलाईन गुंतवणूक करण्यापूर्वी सगळी माहिती घ्या. अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधल्यास चौकशी न करता आर्थिक व्यवहार करणे टाळा. UPI अॅपवर समोरच्या व्यक्तीच्या नावाची पडताळणी करा.

अशा प्रकारची फसवणूक झाल्यास आपण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितलेल्या NCRP वेबसाइट www.cybercrime.gov.in वर फसवणुकीची तक्रार करावी. तसेच हेल्पलाइन क्रमांक १९३० वरही याबाबत तक्रार करू शकतात. यामुळे गुन्हे रोखण्यास आणि गुन्हेगारांना पकडण्यास मदत होते.

Cyber Crime News
Cyber Crime News: कस्टम ऑफिसरने पकडल्याचे सांगत फसवणूक; व्हाट्सअपवरून झाली ओळख

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com