Dombivli News : डोंबिवलीतील तिघा युवकांना लागला ''मोक्का''

टिळक नगर व डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे घडले हाेते.
dombivli police charged three youth mocca act
dombivli police charged three youth mocca actsaam tv
Published On

- अभिजित देशमुख

Kalyan News :

सराईत गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी डोंबिवली पोलिसांनी कठोर पाउले उचलली आहेत . डोंबिवलीत दहशत पसरवणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांवर डोंबिवली पोलिसांनी (dombivli police) मोक्का अंतर्गत कारवाई केली. डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अक्षय अहिरे, सनी तुसांबड, सागर चव्हाण असे मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय अहिरे याच्या विरोधात साेन साखळी चाेरी, मोबाईल चोरी, घरफोडी, हाणामारी असे तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. अक्षयच्या विरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर ही अक्षय तडीपारीचे आदेशाचे उल्लंघन करताना आढळला.

dombivli police charged three youth mocca act
Shiv Sena : शरद पवार गटाला दणका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास सुखद धक्का;जाणून घ्या काय घडलं कोकणात?

ताे टिळक नगर व डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करताना आढळून आला होता. अखेर पोलिसांनी सराईत गुन्हेगार अक्षय अहिरे व त्याच्या दोन साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

dombivli police charged three youth mocca act
Train Cancelled List : रेल्वेकडून 6 फेब्रुवारीपर्यंत 24 गाड्या रद्द; जाणून घ्या एक्सप्रेसची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com