Dhule News : धक्कादायक! विवाहितेचा गळा आवळून खून; धुळे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Dhule Crime News : पती आणि सासऱ्याने विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे उघडकीस आली आहे. कुटुंबावर वारंवार अपशब्द काढत असल्याचा राग मनात धरून व पैसे देत नाही या रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहितीआहे.
Dhule News
Dhule NewsSaam Digital

Dhule News

पती आणि सासऱ्याने विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे उघडकीस आली आहे. कुटुंबावर वारंवार अपशब्द काढत असल्याचा राग मनात धरून व पैसे देत नाही या रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहितीआहे. या प्रकरणी संशयित आरोपी पती व सासऱ्यास शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. विवाहितेच्या मुलाने दिलेल्या जबाबावरून त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.

सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार

मुंबईतील सायन कोळीवाडा चर्च परिसरात गोळीबार झाल्याची माहिती हाती आली आहे. पॅरोलवर सुटून आलेल्या व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. पैशांच्या मागणीसाठी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबार प्रकरणी अँटॉप हिल पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबईच्या सायन कोळीवाडा चर्च परिसरात पैशांच्या व्यवहारातून आरोपी आणि पीडित व्यक्तीमध्ये भांडण झालं. या दोघांमधील भांडण टोकाला पोहोचलं. त्यानंतर आरोपीने पीडित व्यक्तीवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेत पीडित व्यक्ती जखमी झाला. या घटनेतील पीडित व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी पहाटे झालेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Dhule News
NIA Attacked In Bengal: पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला, २ अधिकारी जखमी

मुंबई आग्रा महामार्गावर वाहनधारकांना लूटणाऱ्यांना अटक

मुंबई आग्रा महामार्गावर वाहनधारकांची लूट करणाऱ्या दोघा सराईतांच्या आझाद नगर पोलिसांनी मोहाडी पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये या चोरट्यांनी लुटलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर वरखेड फाटा या ठिकाणी वाहनधारक सकाळच्या सुमारास आपले वाहन उभे करून वाहनाची सफाई करत असताना दोघा सराईतांनी दुचाकीवरून येऊन चाकूचा धाक दाखवत संबंधिताचा मोबाईल लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती.

Dhule News
Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com